Aam Aadmi Party lost the election, Congress score zero : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रहार
Nagpur नवी दिल्लीच्या निवडणूकीत २७ वर्षांनंतर भाजप सत्तेवर आल्यानंतर पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. या विजयानिमित्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीतील नेते-पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी जनतेने आम आदमी पार्टीची दारूची नशा उतरवली आहे, असा प्रहार त्यांनी केला.
जनतेच्या पैशावर आपली घरे भरण्याचा नाद आम आदमी पार्टीच्या नेत्यांना लागला होता. आपच्या नेत्यांमध्ये भाजपा द्वेषाची चढाओढ होती. बोलण्यातून विखार उतरत होता. या द्वेषावर दिल्लीतील देशभक्त जनतेने रामबाण उपाय शोधला. आप सरकारची मद्याची नशा उतरविली, असा प्रहार त्यांनी आपच्या नेत्यांवर केला. तर कॉंग्रेसच्या बोलबच्चन नेत्यांना जनतेने गेटआऊट केल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला.
Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगरपालिकेत निवडणूकीची नांदी !
दिल्लीचे तख्त भाजपाने काबीज केले. ही अतिशय आनंदाची घटना आहे. गेली २७ वर्षे भाजपा कार्यकर्ते आजच्या दिवसाची प्रतीक्षा करत होते. दिल्ली प्रदेश भाजपा अध्यक्ष वीरेंद्रभाई सचदेव यांच्या मेहनतीला, संघटन बांधणीला, टीमवर्कला यश आले. विशेष म्हणजे ‘दिल्ली के दिल में मोदी’ हा नारा या निकालाने खरा करून दाखवला, असं ते म्हणाले.
दिल्लीच्या मनात कमळ आहे, असं आम्ही म्हणत होतो. दिल्लीतील मराठीबहुल मतदारसंघात कमळ फुलले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील मराठी जनतेला सोबत येण्याची साद घातली. अनेक बैठका, जाहीर सभा घेतल्या. घरोघरी प्रचार केला. त्याचा सकारात्मक परिणाम निकालातून दिसून आला आहे, असंही बावनकुळे म्हणाले.
Sudhir Mungantiwar : देशाच्या प्रगतीमधील केजरीवाल नावाचा अडसर हटला !
महाराष्ट्रातील यशामुळे सैरभैर झालेले राहुल गांधी आणि त्यांचे सख्खेसोबती उबाठा सेनेचे नेते कालच महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मताधिक्यावर मीठ चोळून गेले. मतांचे हिशोब मागत होते. मतदारांचा, लाडक्या बहिणींचा अपमान करत होते. आज दिल्लीतील जनतेने त्यांना ‘गेटआऊट ‘ म्हटले. एकही जागा काँग्रेस मिळवू शकली नाही. आता तरी, मतदारांच्या मतांचा आदर करण्याचे काँग्रेसने शिकावे. आरोप करण्याचे सोडून आता आत्मपरिक्षण केले पाहिजे, असा चिमटादेखील बावनकुळे यांनी काढला.