Breaking

Aam Aadmi party: भरमसाठ मालमत्ता कर रद्द करा; ‘आप’चे आमरण उपोषण सुरू

Hunger strike against increased property tax : ९ दिवसांच्या साखळी उपोषणानंतर निर्णायक पावले

Akola भरमसाठ मालमत्ता कर रद्द करावा, व्याज माफ करण्यात यावे आणि नागरी सुविधा सुधाराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी आम आदमी पक्ष (आप) तर्फे सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. ७ जुलैपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला ९ दिवस उलटल्यानंतरही महापालिकेकडून ठोस उपाय न झाल्याने १५ जुलैपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

महानगर अध्यक्ष अल्हाद मसूद अहेमद खान, तसेच अरमान खान, अशोक शेगोकार आणि प्रा. प्रदीपकुमार गवई या चार पदाधिकाऱ्यांनी महापालिकेजवळ आमरण उपोषण सुरू केले असून, यामध्ये महिलांचाही सक्रीय सहभाग आहे.

Mahayuti Government : भाजप-राष्ट्रवादी भिडले, अमरावतीत महायुतीमध्ये तणाव

महापालिका प्रशासनाने २ ऑगस्ट २०२३ पासून मालमत्ता कर, बाजार-परवाना, पाणीपट्टी आणि दैनंदिन बाजार वसुलीचे कंत्राट स्वाती इंडस्ट्रीज या कंपनीला दिले होते. मात्र करारातील अटींचे पालन न केल्यामुळे ३१ डिसेंबर २०२४ रोजी हे कंत्राट रद्द करण्यात आले.

तरीही नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिक कर भरण्यात उत्सुक नाहीत. या पार्श्वभूमीवरच ‘आप’ने आंदोलनाचा पवित्रा घेतला.

‘आप’च्या प्रमुख मागण्या :

मालमत्ता करावरील व्याज रद्द करावे व टॅक्स कमी करावा

२०१७ मध्ये वाढवलेला टॅक्स पूर्वीच्या दरात आणून केवळ १०% वाढ स्वीकारावी

१०,००० रुपयांवरील घर टॅक्स हप्त्यांमध्ये स्वीकारावा

मनपाच्या शाळांमध्ये डिजिटल एलईडी बोर्ड, टेबल-खुर्च्या, पंखे, स्वच्छतागृह व शुद्ध पाणी उपलब्ध करावे

मनपाच्या हॉस्पिटलमधून दररोज आरोग्य तपासणीची सुविधा

हद्दवाढीच्या प्रभागांमध्ये सिमेंट रस्ते व नाले बांधकाम

नागरिकांना दररोज किंवा एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा

मनपाचे पत्र आणि चर्चेचा अपयशी फड

 

‘आप’च्या म्हणण्यानुसार, महापालिकेने केवळ मालमत्ता कराच्या मुद्द्यावर लेखी पत्र देऊन आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते. मात्र इतर मागण्यांबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही.
आंदोलनाच्या तीव्रतेनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी पुन्हा ९ प्रमुख मागण्यांवर चर्चा केली. मात्र तोडगा न निघाल्याने आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Illegal Sand Mining : अधिकारी झोपेत आहे, खडकपूर्णा धरणातून बिनधास्त उपसा रेती!

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव डोके, राज्य सहसचिव अरविंद कांबळे, अमरावती जिल्हाध्यक्ष सुभाष गहत्रे, विदर्भ संयोजक समिती सदस्य अरुण इंगोले आणि यवतमाळ तालुका अध्यक्ष शेख मोमीन आदी वरिष्ठ पदाधिकारी अकोल्यात दाखल झाले होते.