Free Health Care through Golden Card : अमरावती जिल्ह्यात विशेष मोहिम सुरू
Amravati नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी यासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना AB PM-JAY आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या MJPJAY माध्यमातून गोल्डन कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. या कार्डद्वारे कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे. शासनाने यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष मोहिम हाती घेतली आहे. नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत, नगरपरिषद, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, आरोग्य सेवक यांच्याशी संपर्क साधून कार्ड काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Narhari Zirwal : विशेष सहाय्य योजनांचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अंत्योदय रेशनकार्ड, पिवळे रेशनकार्ड, केशरी रेशनकार्ड, पांढरे रेशनकार्ड यापैकी एक आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या सूचनेनुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम सुरू आहे.
12 अंकी रेशनकार्ड, आधारकार्ड, मोबाईल नंबर (रेशनकार्डशी संलग्न असावा), आयुष्मान भारत ई-कार्ड ही कागदपत्रे गोल्डन कार्डसाठी आवश्यक आहेत. लाभार्थी आशासेविका, कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार केंद्र, रूग्णालयातील “मित्र” यांच्याकडून तसेच “पीएमजे ॲप” डाऊनलोड करून स्वतःही हे कार्ड काढू शकतात.
Mission 100 Days : मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटमुळे मनपाचा अर्थसंकल्प रखडला!
स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार
योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 34 मान्यताप्राप्त स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 1,356 गंभीर आजारांवर 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी पात्र नागरिकांना गोल्डन कार्ड काढण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सर्वांना मोफत आरोग्यसेवा मिळू शकेल.