Three months extension from Mahavitraan : कायदेशीर कारवाईची तयारी ठेवण्याचा इशारा
Wardha महावितरणने थकीत वीज बिलामुळे कायमस्वरूपी खंडित झालेल्या वीज पुरवठा पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘अभय योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा लाभ ग्राहक 31 मार्च 2025 पर्यंत घेऊ शकतात. ही योजना 1 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली होती आणि आता तिला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पण या मुदतीत थकबाकी भरावीच लागणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईची तयारी ठेवावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
महावितरणने स्पष्ट केले आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक, खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. या रक्कमेचा भरणा न झाल्यास ग्राहकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
अभय योजनेत थकीत बिलाची मुद्दल भरल्यास त्यावरील व्याज व विलंब शुल्क माफ करण्यात येत आहे. ग्राहकांना बिलाच्या मुद्दलाच्या 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरायची सोय आहे. एकरकमी थकीत बिल भरणारे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहकांना दहा टक्के सवलत देण्यात येईल.
Justice Devendrakumar Upadhyay : प्रलंबित प्रकरणांवर मुख्य न्यायमुर्तीं स्पष्टच बोलले
जिल्ह्यातील एक हजार 623 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत 88 लाख 99 हजार रुपयांचा भरणा केला आहे. मात्र, अजूनही अनेक ग्राहकांनी बिलाचा भरणा केला नसल्याने त्यांनी मुदतीत बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 31 मार्चनंतर थकीत बिल न भरल्यास महावितरणने संबंधित ग्राहकांवर कारवाईचा इशारा दिला आहे