Abuse of tribal woman : पोलिस पाटलाची पदावरून हकालपट्टी

Police patil of retyakhedya dismissed from post : रेट्याखेडा घटनेतील सहभाग भोवला

Amravati चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील आदिवासी वृद्ध महिला काळमी शेलूकर यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पोलिस पाटील बाबू जामूनकर याला मंगळवारी पदावरून बडतर्फ करण्यात आले. धारणीच्या उपविभागीय अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांनी ही कार्यवाही केली असून यामुळे संपूर्ण मेळघाटात खळबळ उडाली आहे.

ग्रामसभेत रोजगार सेवकाचा पदभार दुसऱ्या व्यक्तीकडे सुपूर्द करण्यात आला. रेट्याखेडा प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी काही व्यक्तींचे मोबाइल जप्त केले.

Ramtek festival : सांगितिक मैफल आणि रामायण महानाट्य; आजपासून रामटेक महोत्सव !

अनेकांच्या मोबाइलमधील घटनाक्रमाचे पुरावे डिलीट करण्यात आल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. यामुळे घटनेचे अनेक महत्त्वाचे पुरावे नष्ट झाले आहेत. गंभीर अवस्थेतील पीडिता काळमी शेलूकर यांच्यावर सध्या अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वयोवृद्ध महिलेला झालेल्या शारीरिक जखमांबरोबरच मानसिक आघातामुळे तिची प्रकृती खालावली आहे. डॉक्टर दीपक कुंडेकर यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक तिच्यावर उपचार करत आहे. या घटनेच्या संदर्भात मानव हक्क आयोगाने तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महिला व बाल विकास विभागातील विधी सल्लागार ॲड. विलास काळे यांनी या आदेशाची माहिती दिली.

Mahayuti Government : शिक्षण देणाऱ्या गाडीला लागला ब्रेक !

घटनेचा तपास गतीने सुरू असून दोषींना योग्य ती शिक्षा होण्याची मागणी होत आहे. पोलिस विभागाने या प्रकरणात हलगर्जीपणा दाखवल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित ठाणेदार आणि जमादारांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.