Breaking

ABVP Vidarbh Prant Adhiveshan : अभाविपचा अजब प्रस्ताव, थेट विद्यापीठच बंद करण्याची मागणी!

Proposal to close DBATU University as servers are down : डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील सर्व्हरचा मुद्दा गाजला

Nagpur विद्यापीठाचे स्वत:चे सर्व्हर नसल्याने त्यात सुधारणेची मागणी करणे अपेक्षित होते. पण थेट डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठच (डीबाटू) बंद करण्याची अजब मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या संघटनेच्या ५३ व्या प्रांत अधिवेशनात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

अभाविपच्या विदर्भ प्रांतमंत्री पायल किनाके यांनी साेमवारी पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली. डीबाटूचे सर्व्हर बंद असल्याने विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागताे आहे. याशिवाय परीक्षांचे वेळापत्रक आणि निकालाबाबत अनेक समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत असल्याचा आराेप त्यांनी केला.

NIT NMC : दोन विकास संस्थांवरून वाद पेटला!

त्यामुळे एकतर डीबाटू बंद करावे. किंवा या विद्यापीठाशी संलग्नित लोणेर, रायगड येथील महाविद्यालयांना स्थानिक विद्यापीठांशी संलग्नित करावे. अशा मागणीचा प्रस्ताव सरकारला सादर करणार असल्याचे किनाके यांनी सांगितले. विशेष म्हणजे देशाच्या सर्व राज्यातील वैद्यकीयप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठीही स्वतंत्र विद्यापीठे आहेत.

राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे एकत्रित विद्यापीठ असावे म्हणून डीबाटूची स्थापना करण्यात आली हाेती. मात्र, अद्याप असंख्य अभियांत्रिकी महाविद्यालये डीबाटूशी संलग्नित नाहीत. आता हे विद्यापीठच बंद करण्याची मागणी हाेत असल्याने नवा वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे.

Dr. Pankaj Bhoyar : शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा

अभाविपच्या अधिवेशनात राज्यातील विद्यापीठात हाेणाऱ्या निवडणुका पूर्ववत सुरू व्हाव्या, ही मागणी करण्यात आली असून, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यासह काैशल्य विद्यापीठ स्थापन करणे, विदर्भातील तिन्ही विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक घाेषित करणे, गडचिराेली व मेळघाटात वनाैषधी प्रशिक्षण केंद्र तयार करणे, विदर्भातील शासकीय वसतिगृहांची प्रवेश क्षमता वाढविणे, जि.प. शाळांची सुधारणा करण्यासह इतर प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे किनाके यांनी सांगितले.