Breaking

Accident at Yavatmal MIDC : दाल मिलमधील स्टोरेज कोसळले, तीन मजूर जागीच ठार !

 

Three laborers killed on the spot after storage collapses in dal mill at Yavatmal MIDC : इतर दोन गंभीर, यवतमाळ एमआयडीसी परिसरातील घटना

Yavatmal : दारव्हा मार्गावरील यवतमाळ एमआयडीसीमध्ये मनोरमा जैन दाल मिलमध्ये स्टोरेज कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात तीन मजूर जागीच ठार झाले. ही घटना आज (१५ एप्रिल) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

पाच मजूर डाळ स्टोरेजवर काम करत होते. स्टोरेज कोसळ्यावर पाच जण गंभीर जखमी झाले. काही क्षणांतच तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भावेश कडवे रा. वर्धा, मुकेश सुरेश कडवे, सुरेश कडवे दोघेही रा. रामपुर (खंडवा) अशी मृत मंजुराची नावे आहेत. तर करणसींग धुर्वे आणि दिलीप नामक अन्य एक मजूर दोघेही रा़ रामपुर (खंडवा) अशी मृतांच्या जखमी सहकारी कामगारांची नावे आहेत़. मनोरमा जैन दाल मिलमध्ये तुरीपासून डाळ बनवण्याचे आणि साठवणूक करण्याचे काम सुरू होते. आज सायंकाळी नेहमीप्रमाणे तेथील मजुर काम करत होते़. दरम्यान ही घटना घडली.

Crime in Yavatmal: गुप्तधन शोधणाऱ्या महिलेने रचला दरोड्याचा कट

काम सुरू असताना अचानक स्टोरेज कोसळले़. त्यात पाचही मजूर स्टोरेजच्या लोखंडी साहित्य आणि डाळीच्या पोत्यांखाली दबले़. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले़. ही बाब अन्य कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पाचही जणांना बाहेर काढले. मात्र तोवर तीन मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला होता़.

Yavatmal Crime : भूदान यज्ञ मंडळाच्या मालकीची जमीन विकली!

तिघांचा मृत्यू झाला, हे लक्षात येताच इतर कामगारांनी गंभीर जखमी दोघांना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात आणले. त्यांच्यावर अतिदक्षता गृहात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळ आणि मृतदेहांची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. तिन मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.