Accident in Wardha : पोलीस कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात चौघे ठार!

Four members of a policeman’s family died in an accident : रानडुक्कर आडवे आले; पती-पत्नी व दोन मुलांचा मृत्यू

Wardha तरोडा येथून कुटुंबासह वर्ध्याकडे येत असताना रानडुक्कर कारसमोर आडवे आल्याने कार अनियंत्रित होत टँकरवर आदळली. या अपघातात कार चक्काचूर झाली. पोलिस कर्मचारी, त्यांची पत्नी व दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना समुद्रपूर ते वर्धा मार्गावरील तरोडा गावाजवळ घडली.

प्रशांत वैद्य ४३ वर्षे, प्रियंका प्रशांत वैद्य ३७ वर्षे, प्रियांश प्रशांत वैद्य ८ वर्षे आणि माही प्रशांत वैद्य ३ वर्षे, अशी मृतांची नावे आहे. मांडगाव येथे सोमवारी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम होता. मूळ गाव असल्याने प्रशांत वैद्य कुटुंबासह तेथे गेले होते. ते वडनेर पोलिस ठाण्यात बीट जमादार होते. मांडगाव येथील कार्यक्रम आटोपून सोमवारी मध्यरात्री ते एमएच ४० केआर ३६०३ क्रमांकाच्या कारने वर्ध्याला येत होते.

Electricity bill Overdue : वीज वितरण कंपनीची ग्रामपंचायतींना नोटीस!

तरोडा गावासमोर अचानक कारसमोर रानडुक्कर आडवे आले. रानडुकराला धडक बसल्याने प्रशांतचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित झाली. ती समोरून येणाऱ्या एमएच ०९ सीव्ही २१८५ क्रमांकाच्या टँकरवर जाऊन आदळली. या अपघातात चक्काचूर झाली. कारचा समोरील भाग चूरचूर झाला.

MSRTC : भर उन्हाळ्यात एसटीचा प्रवाशांना गारवा!

यात प्रशांत वैद्य, मुलगी माही हे गंभीर जखमी झाले. प्रियंका आणि प्रियांश जागीच ठार झाले. एका खासगी वाहनाने जखमींना सेवाग्राम येथे नेले. तेथे माही हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रशांतला नागपूरच्या रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र, प्रशांतचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.