Breaking

Action against defaulters : वणी पालिकेची ४ कोटी ३२ लाखांची वसुली!

Wani Municipality recovers Rs 4 crore 32 lakhs : March Ending ला थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम

Yavatmal आर्थिक वर्ष संपत असल्याने थकबाकीदारांविरोधात वणी येथील पालिका प्रशासनाने धडक मोहीम राबविली. त्यात ३१ मार्चअखेर ८६ टक्के वसुली झाली. पालिकेअंतर्गत शहरात २१ हजार ५३६ करधारक व १० हजार ५५१ नळजोडणीधारक आहेत. एकूण चार पथके वसुलीसाठी कार्यरत होती.

पालिकेला पाच कोटी १९ हजार रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी चार कोटी ३२ लाख १९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. म्हणजेच ८६ टक्के वसुली झाल्याने उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी कसरत केल्याचे दिसून येत आहे. करवसुली हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. चांगली वसुली झाल्यास नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक बळकट करता येतील व अधिक चांगल्या सुविधा देता येतील.

Ganesh Naik : शेतकऱ्याला मारहाण केली, चौकशी समिती नेमणार

त्यामुळे मालमत्ताधारकांनी नियमित कर भरावा, असे आवाहन पालिकेने केले होते. परिणामी कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी गृहभेटी देऊन करवसुली मोहिमेला सुरुवात केली होती. सुटीच्या दिवशी म्हणजे गुढीपाडवा व रमजान ईदच्या दिवशीही नागरिकांकडून करवसुलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मालमत्ता करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी जसे सहकार्य केले, तसेच थकीत पाणीपट्टी करवसुलीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Wardha Zilla Parishad : आरोग्य सेवक भरती रखडली, प्रशासनाविरुध्द रोष

वैध नळजोडणींपैकी १० हजार ५१२ घरगुती, ४८ व्यावसायिक, १० हॉटेल, तर १७ संस्थांकडे नळ कनेक्शन आहेत. पालिकेची मागील थकबाकी सात कोटी ९४ लाख १७ हजार ९४८ व चालू मागणी तीन कोटी २३ लाख २० हजार ९८८ अशी एकूण ११ कोटी २१ लाख ३८ हजार ९३६ रुपयांची मागणी आहे. ३१ मार्चपर्यंत यातील फक्त दोन कोटी ३० लाख ४८ हजार १४६ रुपयांची वसुली झाली आहे.