More than 151 acres of agricultural land, property returned : अवैध सावकारीविरोधात कारवाईचा बडगा; अकोला जिल्ह्यात २१४ प्रकरणांत कारवाई
Akola अकोला जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला जोर मिळत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे आतापर्यंत एकूण २१४ प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्यात आली आहे. यापैकी ६१ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे नोंद करण्यात आले असून, ११५ प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत चौकशी सुरू आहे.
या कारवाई दरम्यान, अवैध सावकारीतून बळकावलेली १५१.६४ एकर शेती जमीन, ४,७७६ चौरस फूट क्षेत्रफळाची इमारतीची जागा, एक फ्लॅट आणि १६३.५० चौरस मीटरची इतर मालमत्ता संबंधित शेतकरी व नागरिकांना परत करण्यात आली आहे.
Suresh Dhas : ‘कृषी’ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार
अवैध सावकारीच्या तक्रारीवरून अकोट तालुक्यातील गजानन लक्ष्मणराव माकोडे (रा. खतोरेवाडी, रामटेकपुरा, अकोट) यांच्यावर धाड टाकण्यात आली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ नुसार ही कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण एच. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक निबंधक रोहिणी आर. विटणकर यांनी गठित पथकाद्वारे करण्यात आली.
पथकात दीपक सिरसाट (पथकप्रमुख), डी. डी. गोपनारायण, डी. बी. बुंदेले, जी. एम. कवळे यांचा समावेश होता. धाडीत माकोडे यांच्या ताब्यातून ५९ धनादेश (कोरे व लिहिलेले), ३ स्टॅम्पपेपर, ५ चिठ्ठ्या, ७ डायऱ्या/नोंदवही जप्त करण्यात आल्या.
जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या (तालुकानिहाय)
अकोला : ११०
बार्शीटाकळी : ११
पातूर : ७
बाळापूर : २७
तेल्हारा : ५
अकोट : १६
मूर्तिजापूर : १८
एकूण : १९४ परवानाधारक सावकार