Actor Jitendra praised Gadkari’s work : नागपूरकरांसोबत मराठीत साधला संवाद, खासदार ज्येष्ठ नागरिक महोत्सव
Nagpur गेल्या चार ते पाच दशकांपासून मी नागपुरात येतोय. पण आज फक्त गडकरींनी बोलावले म्हणून आलो. दुसऱ्या कुणाकडून निमंत्रण आले असते तर बहाणा केला असता, असं सांगत बॉलिवूडचे ‘जम्पिंग जॅक’ जितेंद्र यांनी गडकरींवरील आपलं प्रेम व्यक्त केलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन जितेंद्र यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जितेंद्र म्हणाले, ‘गडकरींनी बोलावले म्हणून मी आजच्या कार्यक्रमाला आलो. एरवी बहाणा केला असता. कारण गडकरींवर माझे विशेष प्रेम आहे.’
Devendra Fadanvis : हजारो लोकांना प्रयागराजला जाऊ न शकल्याचं शल्य होतं, पण..
नितीन गडकरींनी केंद्रीय मंत्री म्हणून फार मनापासून काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामाबद्दल ते स्वतः सांगत नाही. त्यांच्या कामांचे कौतुक लोक करतात. देशातील प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला गडकरी माहिती आहेत. मी त्यांना खूप वर्षांपासून ओळखतो. अत्यंत सज्जन माणूस आहे, असंही जितेंद्र म्हणाले.
मराठी बोलता येतं म्हणून चित्रपटात काम मिळालं..
भाषण संपवल्यावर जितेंद्र आपल्या खूर्चीकडे वळले. पण सभागृहातून मराठीत बोलण्याचा आग्रह होऊ लागला. जितेंद्र पुन्हा माईककडे वळले. एक दीर्घ श्वास घेतला. आणि त्यानंतर पुन्हा मराठीत भाषण दिलं. ते म्हणाले, ‘मला मराठी बोलता येतं म्हणून शांतारामबापूंनी चित्रपटात काम दिलं. माझा जन्म अमृतसरचा आहे, पण पंधरा दिवसांचा असताना आईसोबत मुंबईत आलो. तेव्हापासून शंभर टक्के मराठी माणूस आहे.’
चाळीतले दिवस मिस करतो..
मी लहान असताना आम्ही गिरगावला चाळीत राहायचो. १८ वर्षे एका खोलीत राहिलो. चार माळे होते आणि प्रत्येक माळ्यावर २० घरं होती. एकूण ऐंशी घरं होती, पण एक कुटुंब वाटत होतं. आज ३५ वर्षांपासून बंगल्यात राहातोय. पण शेजारी कुणाचा बंगला आहे, मला माहिती नाही. माझ्या आयुष्यातील सुरुवातीची १८ वर्षे सोन्यासारखी होती, अशा भावना जिंतेद्र यांनी व्यक्त केल्या.
समीर म्हणाले, ‘बडी देर से बुलाया’
गीतकार समीर lyricist Sameer यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल रंगली. समीर यांनी अनेक आठवणी सांगितल्या. पण त्यापूर्वी त्यांनी गडकरींना ‘आपने बडी देर से बुलाया’ असं म्हणत मिष्किली केली. ‘मी अनेक वर्षे वाट बघतोय की गडकरी साहेब मला निमंत्रण देतील. पण जेव्हा या कार्यक्रमाचे निमंत्रण आले, तेव्हा माझ्या लक्षात आले की, गडकरी साहेब मी ज्येष्ठ होण्याची वाट बघत होते,’ असं समीर यांनी म्हटलं. त्यानंतर सभागृहात जोरदार हशा पिकला.