Breaking

Adivasi Pardhi Development Council : जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

File a case of atrocity against Junnar MLA Sharad Sonawane : आदिवासी पारधी विकास परिषदेची मागणी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल

Junnar : जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर फासे पारधी आणि इतर अनुसूचित जमातींविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप आदिवासी पारधी विकास परिषदेने केला आहे. सोनवणे यांनी फासे पारधी समाजाला “चोर” आणि “गुन्हेगार जमाती” असे संबोधल्याने आदिवासी समाजात तीव्र संताप उफाळून आला आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत असल्याचा दावा परिषदेने केला आहे.

आदिवासी पारधी विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल पवार यांनी सांगितले, “आमदार शरद सोनवणे यांचे वक्तव्य संविधानविरोधी असून, अनुसूचित जमातींचा अपमान करणारे आहे. अशा व्यक्तींवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (अट्रॉसिटी कायदा) अंतर्गत कठोर कारवाई व्हावी.” परिषदेने सर्व आदिवासी बांधवांना स्थानिक पोलिस ठाण्यांत अट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Devendra Fadanvis : भानुताईंच्या संस्कारांतून नितीन गडकरींना ऊर्जा मिळाली !

परिषदेने राज्यभरातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग आणि केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे निवेदन सादर केले आहे. येत्या काही दिवसांत राज्यभरातील अनुसूचित जमातींच्या संघटनांसोबत बैठका आयोजित करून पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. तसेच, सामाजिक न्याय विभागाकडेही याबाबत निवेदन सादर करण्याची तयारी सुरू आहे.

Vijay Wadettiwar : जसा मासा पाण्याविणा, तशी राष्ट्रवादी सत्तेविणा !

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अंतर्गत, अनुसूचित जमातींविरुद्ध अपमानजनक वक्तव्य किंवा हिंसा भडकवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. या प्रकरणी तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी आदिवासी पारधी विकास परिषदेचे महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक बबन गोरामन आणि प्रदेश युवा अध्यक्ष अतिश पवार यांनी केली आहे.
जुन्नरमधील आदिवासी आणि फासे पारधी समाजाने या अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी सर्व समाजबांधवांना एकत्र येण्याचे आवाहन परिषदेने केले आहे.