Injustice against the Pardhi community in Beed District : अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत सावकाराने हडपली जमीन
Beed : केज तालुक्यातील केवड गावात आदिवासी पारधी समाजातील काळे कुटुंबावर अवैध सावकारीमुळे मोठा अन्याय झाला आहे. अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत सावकार सुग्रीव नामदेव सपाटे व त्यांचा मुलगा रत्नाकर सुग्रीव सपाटे याने शांतीनाथ उत्तम काळे यांची वडिलोपार्जित जमीन हडपून त्यांना बेघर केले. या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ कारवाई करून आदिवासी अशिक्षित पीडित पारधी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठा पारधी समाज सरसावला आहे.
तक्रारकर्त्या इंदुबाई दीपक काळे यांनी सांगितले की, सासरे शांतीनाथ उत्तम काळे यांच्या नावाने असलेल्या शेत जमीनीवर आपले व कुटुंबीयांचे ऊसतोड कामातून उदरनिर्वाह करतो आहे. केवड गावातील स्वतःच्या शेतजमिनीवर पत्र्याच्या कच्च्या घरात राहात होतो. दीपक काळे यांच्या आई छाया शांतीनाथ काळे यांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याने उपचारासाठी त्यांनी सावकार सुग्रीव सपाटे व रत्नाकर सुग्रीव सपाटे यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपये उसने घेतले. मात्र, अशिक्षितपणामुळे सावकाराने त्यांच्याकडून जमिनीची रजिस्ट्री स्वतःच्या नावावर करून घेतली. याची काळे कुटुंबाला काहीच कल्पना नव्हती. सावकाराने नंतर तहसीलदार आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करत काळे कुटुंबीयांवर अतिक्रमणाचा आरोप लावला. यानंतर प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीने त्यांचे घर उद्ध्वस्त केले, ज्यामुळे हे आदिवासी कुटुंब बेघर झाले.
Ganeshutsav 2025 : ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष देशभरात उत्साह !
या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पीडित काळे कुटुंबाने नागपूर गाठले. चार दिवस उपाशी राहून, भिकेतून मिळालेल्या पैशांतून त्यांनी नागपूर पर्यंत कसाबसा प्रवास केला. सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार यांच्याशी संपर्क साधून नागपूर येथे पोहोचल्याची माहिती दिली. अनिल पवार यांच्यासोबत जाऊन त्यांनी नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयात सहसचिव आयएएस आशा पठाण यांची भेट घेतली. “आमची वडिलोपार्जित जमीन परत मिळवून द्या, आम्ही भूमिहीन झाल्याने दारोदारी भटकत आहोत” अशी मागणी केली. सावकाराकडून जीवाला धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.
आशा पठाण यांनी तात्काळ दखल घेत बीडच्या पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सावकारावर कारवाई करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. चांप्याचे माजी सरपंच अतिश पवार व सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्री दहा वाजताच्या सुमारास सक्करदरा पूलाखाली आश्रय घेतलेल्या काळे कुटुंबाला आपल्या घरी आणले. नतंर त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविली आणि अवैध सावकारावर त्वरित कारवाईची मागणी केली. आयोगानेही कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
Manoj Jarang’s Agitation : जरांगेंच्या आंदोलनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ‘वेट अॅंड वॉच’
परंतु पीडितानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांची भेट घेतल्याशिवाय आम्ही परत बीडला जाणार नसल्याचे काळे कुटुंबियांनी सांगितले.नतंर आयोगाचे उपाध्यक्ष यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आयोगानी यां प्रकरणाची गंभीर दखल घेतं सदर कुटुंबियाला मुंबई ला बोलावलं आहे. प्रशासन त्या सावकाराच्या विरोधात काय कारवाई करते, याकडे समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.