Adivasi Pardhi Development Council : आदिवासी विभागाच्या हलगर्जीपणामुळे पारधी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास !

Pardhi students face life-threatening journey due to negligence of tribal department : वसतिगृह प्रवेश प्रक्रिया साइटवर अद्यापही प्रलंबित

Yavatmal : पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आदिवासी विभागावर आहे. मात्र, यवतमाळ येथे बीएसडब्ल्यूच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या आदिवासी व पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज जीव मुठीत घेऊन रात्रीपर्यंत प्रवास करावा लागत आहे.

आजघडीला सर्व महाविद्यालयांचे वर्ग नियमित सुरू झालेले आहेत. वसतिगृह प्रवेश प्रक्रिया साइटवर अद्याप प्रलंबित आहे. परिणामी, आदिवासी पारधी समाजाच्या विद्यार्थिनीवर ब्राह्मणवाडा गावाहून यवतमाळ शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत आहे. सध्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे हा प्रवास आणखी धोकादायक बनला आहे.

BEST Election ; ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि उत्तर शून्यच…

या हलगर्जीपणाचा फटका आदिवासी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर वसतिगृह सुरू करून सुरक्षित निवासाची व्यवस्था करण्याची नितांत गरज आहे. पांढरकवडा एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी यांनी ही प्रक्रिया तात्काळ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आदिवासी विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.