Breaking

Adivasi Pardhi Samaj Parishad : आदिवासी पारधी समाजाच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण ठरणार पुण्याची परिषद !

Dattatray Bharane Maharashtra State Scheduled Castes and Tribes Commission Vice Chairman Adv. Dharmapal Meshram : पारधी मुक्ती राष्ट्रीय परिषदेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्यासह दिग्गजांचा सहभाग

Pune : महाराष्ट्राचे नवनियुक्त कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम ३० व ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यात आयोजित आदिवासी पारधी मुक्ती राष्ट्रीय परिषद व मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देशभरातील पारधी समाज बांधव सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम आदिवासी पारधी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या अधिवेशनाला अखिल भारतीय आदीम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रूपसिंगभाई भरभडिया, राष्ट्रीय महासचिव बबन गोरामन, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदेव भोसले यांच्यासह विविध राज्यांतील आदिवासी पारधी बांधव उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनात पारधी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.

Bomb blast case : बॉम्बस्फोट आपोआप होत नाहीत; मग ते करणारे कोण?

आदिवासी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काश्मीर शिंदे, महासचिव सुरेश पवार, उपाध्यक्ष उपदेश भोसले, राणी शिंदे आणि पुणे जिल्हाध्यक्ष हर्षद पवार यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना या परिषदेसाठी विशेष आमंत्रण दिले आहे. या परिषदेत पारधी समाजाच्या समस्या, हक्क आणि विकासाच्या संधींवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच, शेतीच्या वादांतून होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या समस्यांवरही प्रकाश टाकला जाईल.

Dancebar case : तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय? ‘ कोहिनूर’चा हिशेब सांगा !

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेळाव्याच्या माध्यमातून पारधी समाजाला एकत्र आणून त्यांच्या प्रगतीसाठी दिशादर्शक पावले उचलली जाणार आहेत. यावेळी आदिवासी पारधी समाजातील वन हक्क धारक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी निवेदन सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पारधी समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.