Administration : प्रशासकीय रचना, कामकाजाच्या प्राधान्यक्रमात बदल !

Transfers of IAS officers : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका

Mumbai : महाराष्ट्रात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. गेल्या आठवड्यात पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता आणखी सात अधिकाऱ्यांचे फेरबदल करण्यात आले आहेत. शासनाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय रचना आणि कामकाजाच्या प्राधान्यक्रमांमध्ये बदल होणार आहेत.

मुंबईतील उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून डॉ. अशोक करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी हे पद भूषवणारे सुशील खोडवेकर यांची बदली असंघटित कामगार विकास आयुक्त, मुंबई या पदावर झाली आहे.

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांच्या ‘किचन ३६५’ भेटीवर युवक काँग्रेसचा संताप!

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील प्रकल्प अधिकारी आणि अटापल्लीचे सहाय्यक जिल्हाधिकारी असलेले गोयल आता नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. त्याचप्रमाणे, डॉ. जी.व्ही.एस. पवनदत्त यांची गडचिरोलीच्या देसाईगंज उपविभागातून बदली होऊन ते आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी inयांची बदली त्याच जिल्ह्यातील गोंडपिपरी उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या फेरबदलांमध्ये तुकाराम मुंढे, आशा अफजल खान पठाण, अभय महाजन, ओंकार पवार आणि नितीन पाटील या अधिकाऱ्यांचा समावेश होता. सततच्या या बदल्यांमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांच्या गती आणि प्राधान्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bacchu Kadu : सरकारी अधिकाऱ्याला मारहाणप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांना तीन महिन्यांची शिक्षा

राज्यातील ही बदल्यांची मालिका लक्षवेधी ठरत असून, पुढील काही आठवड्यांत आणखी फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.