Breaking

Adulteration in milk : दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक शिक्षा करण्याची मागणी

Padalkar, Khot expressed serious concern while demonstrating : पडळकर, खोत यांनी प्रात्यक्षिक दाखवत व्यक्त केली तीव्र चिंता

Mumbai : महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी, दुधातील भेसळीच्या मुद्द्यावर तीव्र चिंचा व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी दुधात नेमकी भेसळ कशी केली जाते याचे
थेट प्रात्यक्षिक दाखवले. शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

पावसाळी अधिवेशना दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधात कशाप्रकारे भेसळ केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखवले. शेतकरी दुधात भेसळ करत नाही, सरकारने दुधात भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी
त्यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे विधानभवन परिसरात एक मिक्सर, दूध आणि पाण्याच्या बॉटल, चुना, काही वेगवेगळे केमिकल घेऊन आले. त्यांनी यावेळी हे सर्व मिक्स करुन दुधात कशापद्धतीने दोन प्रकारे भेसळ केली जाते, याबद्दलची माहिती देत थेट प्रात्यक्षिकच दाखवले.

Eknath Shinde : आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा प्रभाव रोखण्यासाठी रणनीती !

मुंबई, पुणे यांसारख्या शहरात सर्रास दुधात भेसळ केली जाते. शेतकऱ्यांना दुधाला दर मिळाला पाहिजे, म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. यामुळे लोकं मरायला लागली आहेत. पुण्यात, मुंबई, नागपुरात राहणारी लोक दिवसभर कष्ट करतात, मेहनत करतात. अनेक लहान मुलांना हे दूध पाजले जाते. सध्या कॅन्सर वाढण्यामागे किंवा रोग वाढण्यामागे कारण काय? तर हे सर्व केमिकल यासाठी जबाबदार आहे. आमची सरकारला एकच विनंती आहे की, तात्काळ त्यांनी या विषयावर काही तरी निर्णय घ्यावा. यामुळे शेतकऱ्याला दर मिळत नाही आणि इकडे कष्ट करुन दूध खरेदी करणाऱ्याला चांगल्या प्रतीचे दूध मिळत नाही. असा आरोप आमदारांनी केला आहे.

Manoj Jarange : आरपारची लढाई, तिसर्‍या दिवशी आरक्षणाचा गुलाल !

राज्यात दररोज म्हशीचे ८० ते ९० लाख लीटर दूध तयार होते आणि गायीचे दूध १ कोटी २५ लाख लीटरपर्यंत तयार होते. यातील ७० लाख दूध हे पॅकिंग केले जाते आणि उर्वरित दूध इतर गोष्टींसाठी वापरले जाते. सध्या मोठ्या प्रमाणात भेसळीचे दूध स्वस्त दरात विक्रेत्यांकडे येते. यावर त्यांना कमिशन मिळते. एकीकडे शेतकऱ्याला लुटायचे दुसरीकडे ग्राहकांनाही लुटायचे आणि आमच्या आरोग्याशी खेळायचे असं दूध माफियांचे चाललं आहे. अशा लोकांना जन्मठेपेपर्यंतची कडक शिक्षा झाली पाहिजे. तरच दूध शेतकरी, सामान्य नागरिक आणि लहान लेकरांचे आरोग्य वाचेल. १०० टक्के भेसळीच्या दुधाचा कायदा कडक केला पाहिजे. फूड ट्रकची तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. कारण आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत. असे सदाभाऊ खोत म्हणाले.