Agriculture minister announces karushi mall in all districts : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उभारणार, कृषी मंत्री कोकाटेंची घोषणा
Mumbai दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. असे निर्देश कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. यामुळे कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी माल देखील याच ठिकाणी विक्री देखील होईल अशी ही योजना आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, उपाययोजना व सांगली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालया संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषी मंत्री कोकाटे बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, कृषी आयुक्त सूरज मांढरे यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोकाटे म्हणाले की, सोलापूर येथे कृषि भवन व बाजारपेठ मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल व शहरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना उत्पादित केलेला भाजीपाला, फळे, तृणधान्य, कडधान्य व इतर कृषी आधारित
उत्पादने थेट व माफक दरात खरेदी करता येतील.
याच धर्तीवर राज्यात देखील कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतक-यांना याचा फायदा होईल त्यांचा वेळ वाचून त्यांना सर्व कृषी माल विक्री व कृषीसाठी लागणा-या सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.’एक पीक एक गाव’ ही संकल्पना देखील विकसित करण्यासाठी विचाराधीन आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
कृषी मंत्री कोकाटे म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, पेठच्या कामांना तात्काळ निधी वितरीत करून या महाविद्यालयाचे काम सुरू करा.यामध्ये दिरंगाई करू नका हे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी केल्या.
#Agriculturalmalls #AgricultureMinister #ManikraoKokate #Maharashtrastate #AgriculturalCollege #DepartmentofAgriculture #ॲग्रिकल्चरलमॉल #कृषीमंत्री #माणिकराव कोकाटे #महाराष्ट्रराज्य #कृषीमहाविद्यालय #कृषीविभाग