Leader of Vanchit Bahujan Aghadi attack the former Chief Minister : प्रकाश आंबेडकर यांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला
Akola शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांकडून होत असली तरी त्यांनी स्वतःचा भूतकाळ पाहावा, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्र्यांना नाव न घेता लगावला.
“सत्तेत असताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का केला नाही, याचे उत्तर माजी मुख्यमंत्र्यांनी द्यावे. कर्जमाफी केली तर बॅंकेचे कर्ज सरकारला फेडावे लागते, त्यामुळे बजेटवरील तरतूद कमी होते आणि टेंडरिंग कमी झाल्यास मलिदा घटतो. म्हणूनच कर्जमाफी टाळण्यात आली,” असा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला.
Advance tax : महाराष्ट्राला केंद्राकडून 6,418 कोटींचा कर ॲडव्हान्स!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपवगळता इतर समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय स्थानिक जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याची माहिती ॲड. आंबेडकर यांनी दिली.
Advance tax : महाराष्ट्राला केंद्राकडून 6,418 कोटींचा कर ॲडव्हान्स!
“गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपविरोधात आम्ही एकत्र येण्यास तयार आहोत. मात्र, काँग्रेसला आमच्याशी काय आक्षेप आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे,” अशी टीका आंबेडकर यांनी केली.








