Afghanistan : हल्ला होताच अफगाणिस्ताचा तत्काळ निर्णय!

Death of three cricketers, cricket against Pakistan ruled out : तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू, पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेटला नकार

New Delhi : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमारेषेवरील तणावाने पुन्हा गंभीर वळण घेतले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे केवळ अफगाणिस्तानच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्वात संतापाची लाट उसळली आहे.

या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने तात्काळ मोठा निर्णय घेतला. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेतून अफगाणिस्तानने माघार घेतली आहे. “क्रिकेट आणि रक्तपात एकत्र नांदू शकत नाहीत,” असा ठाम संदेश देत अफगाणिस्तानने या मालिकेतून हात झटकला आहे.

BJPs question ::दीड कोटींची ‘डिफेंडर’ कोणत्या कमिशनमधून आली?

पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राशिद खाननेही तीव्र संताप व्यक्त केला. आपल्या अधिकृत ट्विटमध्ये तो म्हणाला, “पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात निर्दोष नागरिकांचा, महिलांचा, लहान मुलांचा आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा आहे. नागरी वस्त्यांना लक्ष्य करणे हे नृशंस आणि अमानवी कृत्य आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून माघार घेण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.”

Maoism : नक्षलवादाचा शेवट जवळ, माओवाद इतिहास ठरणार

राशिद खानने म्हटले की, “या कठीण काळात मी माझ्या देशाच्या लोकांसोबत उभा आहे. आमच्या देशाची प्रतिष्ठा, आमचा स्वाभिमान, ही कोणत्याही सामन्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे.”

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. क्रीडा आणि राजकारण यांचा संबंध नसावा, असा नेहमीचा सिद्धांत असला तरी या घटनेनंतर अफगाणिस्तानने दाखवलेली भूमिका जागतिक स्तरावर ठाम आणि भावनिक संदेश देणारी ठरली आहे.

____