Breaking

Nagpur Police : मुंबईनंतर उपराजधानीची देहव्यापारात आघाडी !

After Mumbai, Nagpur is leading in in prostitution police fail to prevent the incident : मसाज-स्पामधील प्रकार रोखण्यात पोलिसांना अपयश

राज्यात देहव्यापार झपाट्याने वाढला आहे. गेल्या वर्षभरात मुंबईनंतर सर्वाधिक देहव्यापारविरोधी कारवाया नागपुरात करण्यात आल्या. मुंबईत 26 देहव्यापाराच्या अड्ड्यांवर छापे घालून 80 महिलांना ताब्यात घेतले. तर नागपुरात 66 तरुणी देहव्यापाराच्या दलदलीत सापडल्या. ही धक्कादायक माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरुन समोर आली आहे.

राज्यातील ‘सेक्स रॅकेट’चे Sex Racket क्रेंद म्हणून राजधानी मुंबई नंतर उपराजधानी आता आघाडीवर येऊ लागली आहे. राज्यात देहव्यापाराच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधीची उलाढाल होते. देश-विदेशातून तरुणी देहव्यापाराच्या ‘करारा’वर राज्यात येतात. राज्यात कायदा व सुव्यवस्थेसह महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा सरकारने केला होता. मात्र, महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहेत. यासोबतच राज्यातून अल्पवयीन मुलींचे आणि तरुणींसह विवाहित महिलांचे बेपत्ता होण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे.

एकूणच पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. बेपत्ता झालेल्या अनेक तरुणींना देहव्यापारात ढकलले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महिला सुरक्षेवर भर देण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे राज्यात देहव्यापार वाढला आहे. मुंबई, नागपूर आणि पुण्यात सर्वाधिक देहव्यापार केला जात असल्याची माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावर आहे. मुंबईमध्ये पोलिसांनी 26 ठिकाणी सुरु असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा घातला.

Chhagan Bhujbal : फुले दंपत्याचा विरोध ब्राह्मण्यवादाला !

या छाप्यात 80 तरुणी आणि महिलांना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. यामध्ये 13 व 14 वर्षांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. तरुणींकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या 35 महिला व पुरुष दलालांना अटक करण्यात आली. नागपुरात 25 देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापे घातले. त्यात 66 तरुणी-महिलांना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. त्यात 14 ते 15 वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

स्पा-ब्युटी पार्लरच्या नावावर कुंटणखाने..

मुंबई, नागपूर आणि पुण्यात ब्युटी पार्लर आणि स्पा-मसाज पार्लरच्या नावावर देहव्यापार सुरू आहे. या अड्ड्यांवर सर्वाधिक धाडी घालण्यात आल्या आहे. मुंबईत 80 पैकी 42 तरुणी-महिला ब्युटीपार्लरमध्ये देहव्यापार करताना साडपल्या. नागपुरात 25 धाडींपैकी 14 धाडी ब्य़ुटी पार्लर आणि स्पामध्ये घालण्यात आल्या. 66 पैकी 41 तरुणी ब्युटी पार्लरमध्ये ग्राहकांसोबत पकडल्या गेल्या. त्यामुळे आता देहव्यापारासाठी दलालांनी ब्युटी पार्लर-स्पा सेंटरला लक्ष्य केले आहे.