Breaking

Ahmedabad plane crash : अपघात मेंटेनन्स अभावी की पायलट एरर !

Accident due to lack of maintenance or pilot error : देशातील दुसरा सर्वात मोठा अपघात, देशाची प्रतिष्ठा पणाला

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर काल (ता. १२ जून) बोईंग कंपनीच्या एअर इंडियाच्या विमानाने लंडनसाठी उड्डान भरले असताना अवघ्या ६२५ मिटर उंचीवर असताना अपघात झाला. एका इमारतीवर हे विमान कोसळले. या अपघातात ३००च्या वर नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली गेली आहे. आता या अपघाताची कारणे शोधली जात आहेत. विमानाचे मेंटेनन्स न केल्यामुळे हा अपघात झाला की पायलट एरर होता, हे शोधले जात आहे.

अपघात झालेल्या विमानात १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटीश, एक कॅनडाचा, सात पोर्तुगीज नागरिक होते. ११ लहान मुलं आणि दोन नवजात शिषू होते. १० क्रू मेंबर्सचादेखील या अपघातात मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या अपघाताने देशातच नव्हे तर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बोईंग कंपनीचे हे विमान जुने झाले असल्याचा आरोप केला जात आहे.

MLA Sajid Khan Pathan : पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये खडाजंगी, आमदार-जिल्हाध्यक्ष आमनेसामने

ज्या तज्ज्ञांनी या बोईंगच्या एसेम्ब्ली सिस्टमवर काम केले होते, त्यातील एक सॅमबोर या अभियंत्याने यापूर्वीची एका मुलाखतीत सांगितले होते की, बोईंग कंपनी वेगवेगळ्या ठिकाणांहून विमानाचे पार्ट एकत्रित करते. हे करताना विमानात काही लहान लहान जागा रिकाम्या राहतात. नंतर या रिकाम्या जागा काहीतरी जुगाड करून भरल्या जातात. हे सुद्धा अपघाताचे एक कारण असू शकते. दुसरे एक तंत्रज्ञ विसेल बोर सांगतात की, बोईंगने विमानाची बांधणी करताना नटबोल्ट जबरदस्ती जोडून दिले. ज्यावेळी ही विमाने हजारो उड्डाने करून जुनी होतात. त्यावेळी रिकाम्या भागातील जागा समतोल केल्या जातात, त्या धोक्याच्या ठरतात. त्यामुळे अहमदाबाद विमानतळावर घडलेल्या अपघाताचे हे कारण आहे का, हे आता शोधले जात आहे.

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, राज्यातील अनेक नेते मुख्यमंत्र्यांना भेटतात, यात वेगळं काय?

काल झालेल्या अपघातासाठी बोईंग कंपनीलाच जबाबदार धरले जात आहे. कारण एकाच वेळी विमानाचे दोन्ही इंजीन निकामी होत नाहीत. ही घटना फार दुर्मिळ आहे. मेंटेनन्सचा अभाव किंवा पायलट एरर, यांपेकी एक अपघाताचे कारण असू शकते, असे सांगितले जात आहे.