Ajit Pawar said farmers prosper only if agriculture becomes smart : अजित पवार म्हणाले शेती ‘स्मार्ट’ झाली तरच शेतकरी समृद्ध
Baramati : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या विषयावर शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “भविष्यात हवामान बदल आणि वाढता उत्पादन खर्च लक्षात घेतल्यास कृषिक्षेत्रात एआयचा वापर हा गेमचेंजर ठरेल.”
अजित पवार म्हणाले की, “एआयचा वापर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या माध्यमातून शेती ‘स्मार्ट’ झाली तर शेतकऱ्यांचे जीवन अधिक समृद्ध होईल. तंत्रज्ञानाचा वापर करणारा शेतकरीच भविष्यात खरी प्रगती साधू शकेल. कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ काम करत आहे आणि राज्य सरकार, बँक पातळीवरही आम्ही जबाबदारी पार पाडत आहोत.
Maratha movement : मनोज जरांगेंचं मुंबईत धडकण्याआधी पोलिसांना हमीपत्र;
या कार्यक्रमात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “राज्य सरकार शेतकरी हितासाठी चांगले निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भरघोस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. ठिबक सिंचनाचे उर्वरित अनुदान पुढील महिन्यात जमा होईल.”
Maratha movement : जरांगेंना ‘या’ नेत्यांचा प्रत्यक्षात ‘ फुल्ल सपोर्ट’ !
कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांनीही “भविष्यातील शेतीसंकटावर मात करण्यासाठी एआय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे,” असे मत व्यक्त केले. श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी, “शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवू आणि एआयचा वापर करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करू,” असे सांगितले.
____








