Ajit Pawar was ridiculed by the opposition, criticis strongly : ब्रम्हदेव आला तरी या सरकारला पाच वर्ष कुणीही धक्का लाऊ शकत नाही
Mumbai : केवळ एका वर्षासाठी हा अर्थसंकल्प आम्ही सादर केला नाही. तर २०२४ ते २०२९ पुढील पाच वर्ष डोळ्यांसमोर ठेऊन दिलेला आहे. या काळात कुणी गमतीनंही म्हटलं की, अमक्यानं मुख्यमंत्री व्हावं, तमक्यानं मुख्यमंत्री व्हावं. आम्ही पाठींबा देतो. अरे.. तुमच्याकडं माणसंच नाही, पाठींबा कसला देताय, असे म्हणत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.
अर्थसंकल्पावर आज (१७ मार्च) उत्तर देत असताना अजित पवार यांच्या उपरोक्त विधानाने सभागृहात जोरदार हंशा पिकला. ते म्हणाले, २० टाळकी, १५ टाळकी, १० टाळकी असताना पाठींबा कसला देताय, असे म्हणत त्यांनी विरोधकांना डिवचले. ब्रम्हदेव आला तरी या सरकारला पाच वर्ष कुणी धक्का लाऊ शकत नाही. अर्थसंकल्पावर विरोधक बोलत असताना मी त्यांना अजिबात व्यत्यय आणला नाही. गप गुमान मान खाली घालून ऐकत होतो. आता त्यांनीही मला डिस्टर्ब करू नये.
Ajit Pawar : ‘त्या’ योजना का बंद केल्या? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
आम्ही सादर केलेला अर्थसंकल्प विकसीत महाराष्ट्र आणि विकसीत भारताचं उद्दीष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी सभागृहाला दिली. काही सदस्य बोलले की हे शेतकऱ्यांचे बजेट नाही. कृषी क्षेत्राचा २०२३-२४चा विकास दर ३.३ टक्के होता. गेल्या अडीच वर्षात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं. त्यामुळे २०२४-२५ कृषीचा विकास दर ८.७ टक्क्यांवर गेला. कृषी क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर आणला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
Ajit Pawar : म्हणून तुम्ही बोटांवर मोजण्याइतक्या संख्येने निवडून आले !
जलयुक्त शिवार, एक तालुका एक बाजारपेठ, AI तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढेल, त्यांची पाण्याची बचत कशी होईल, याचे प्रयत्न बांबू लागवडीचे कार्यक्रम, असो किंवा मराठवाडा वॉटर ग्रीड हे सर्व शेतकऱ्यांसाठी केले आहे. आपला शेतकरी मेहनती आहे आणि सरकारने त्यांना पाठबळ दिलं पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ती स्वीकारली आहे. AI तंत्रज्ञान कृषी क्षेत्राला नवी संजीवनी देईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.