Breaking

Ajit Pawar : ‘त्या’ योजना का बंद केल्या? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

 

Ajit Pawar delivered harsh words to the opposition : २०४७मध्ये आपला देश विकसीत राष्ट्रांच्या पंक्तीत बसलेला असेल

Mumbai : आमच्या सरकारने काही योजना बंद केल्याचा उल्लेख सभागृहात वारंवार केला गेला. प्रसार माध्यमांमधून ते दाखवण्यात आलं. पण काही योजना त्या त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार केल्या जातात. जसं कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी काही योजना आणण्यात आल्या होत्या. कोरोनाचा काळ गेल्यानंतर त्या योजना आपण लागू केल्या नाही. सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असतं. ज्या योजना कालबाह्य होतात, त्या बंद केल्या जातात, असे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.

अर्थसंकल्पावर उत्तर देताना आज (१७ मार्च) अजित पवार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, राज्य सरकारच्या एखाद्या योजनेचे साम्य केंद्र सरकारच्या योजनेशी असेल तर अशा योजनेचा निथी दुसऱ्या योजनेकडे वळवता येतो. डबल योजना नसावी, राज्याचा खर्च वाचावा. म्हणून काही योजना बंद करण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत जवळपास सर्वच राज्यकर्त्यांनी जुन्या योजना बंद केल्या. नव्या योजना आणल्या. पुनर्विलोकन केले. त्यामुळे सर्वांनी विनंती आहे की, राज्यातील जनतेमध्ये गैरसमज पसरवू नका.

Ajit Pawar : यांना अरे म्हणता येत असेल, तर मलाही कारे म्हणता येतं !

राज्याच्या हिताच्या ज्या योजना आहेत, त्या महायुती सरकार बंद करणार नाही. २०४७मध्ये आपला देश विकसीत राष्ट्रांच्या पंक्तीत बसलेला असेल, हे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या प्रगतीत मुंबईचा सिंहाचा वाटा आहे. मोदींचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. महाराष्ट्र सर्वाधिक योगदान देईल, हे अर्थसंकल्पातून मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न आमच्या महायुती सरकारने केला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

NCP Ajit Pawar : युवकांनो, राजकारणात सक्रीय सहभाग घ्या !

विकसीत महाराष्ट्र आणि विकसीत भारत हा आम्ही सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा गाभा होता. प्राधान्यक्रम गरजेनुसार बदलत असतो. शेती, उद्योग, पायाभूत सविधा, रोजगार या क्षेत्रांवर फोकस करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून झालेला आहे. लाखो कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. विरोधकांची किव येते. काहीही आरोप करत सुटतात. कुठलंही काम कॉन्ट्रॅक्टर न नेमता कसं करता येईल, असा प्रश्न अजित पवार यांनी करत विरोधकांना खडेबोल सुनावले.