Ajit Pawar took notice of Vijay Wadettiwar’s ‘that’ statement : विजय वडेट्टीवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवारांनी घेतला समाचार
Mumbai : अर्थसंकल्पावर भाषण करताना काहींनी अशी अशी विधानं केली की, आपण कुठं बोलतोय, काय बोलतोय, याचंही भान ठेवलं नाही. स्मारकं बांधा, नाहीतर २०१९मध्ये तुमची स्मारकं बांधण्याची तयारी ठेवा, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार बोलून गेले. ही काय बोलायची पद्धत झाली का, असा सवाल करत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
अर्थसंकल्पावर आज (१७ मार्च) बोलत असताना अजित पवार म्हणाले. एके काळी मंत्रीमंडळात ते माझे सहकारी होते. विरोधी पक्षनेतेही होते. निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो. त्यामुळे अशी भाषा वापरणं योग्य नाही. २०२४च्या निवडणुकीत यांचा दारूण पराभव झाला. तरी आम्ही कधीही ‘तुमची स्मारकं बांधा..’, असं म्हटलं नाही. यांना जर अरे म्हणता येत असेल, तर मलाही कारे म्हणता येतं, असे म्हणत त्यांनी विरोधकांना कडक इशारा दिला.
Ajit Pawar : म्हणून तुम्ही बोटांवर मोजण्याइतक्या संख्येने निवडून आले !
आम्ही त्यांच्यासारखं न करता सामंजस्याची भूमिका घेत असतो. कारण राज्याची जनता हे सर्व बघत असते. काही काहींनी तर हे सरकार पेडल रोड, मलबार हील येथील आहे, गरीबांचे नाही, असंही बोलून गेले. या सरकारने गरीबी हटवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. थेट लाभ देण्याचा प्रयत्न करणारं, महाराष्ट्राच्या निर्मीतीपासून हे पहीलं सरकार आहे. लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे त्यांच्या खात्यात दिलेले आहेत. याआधी असे काम कुणीही केलेले नाही.
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प
ज्यांनी या देशाच्या औद्योगित प्रगतीमध्ये मोठा हातभार लावला, त्या टाटा उद्योग समुहाच्या बाबतीतही अपमानजनक बोलले गेले आहे. टाटा समुहाविषय देशात आणि राज्यात मानाचे स्थान आहे. व्यकीगत अपमान होईल, असे या सभागृहात बोलू नये. विरोधकांच्या ‘कुठे गेला तुमचा वादा?, या प्रश्नावर अजित पवार यांनी शायरीतून उत्तर दिले. ते म्हणाले, ‘जिसे निभा ना सकू ऐसा वादा नही करता, मै बातें अपनी ताकत से ज्यादा नही करता, तमन्ना रखता हू आसमान छू लेने की, लेकीन औरो की गिराने का इरादा नही रखता’. विरोधक येवढ्या कमी संख्येने आहेत की, त्याच मला हसू येतं आणि शेरोशायरी सुचते, असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.