Appointment of Suraj Chavan, the Chhawa organization is aggressive : सूरज चव्हाणच्या नियुक्तीने छावा संघटना पुन्हा आक्रमक.
Mumbai : छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुन्हा संधी देत प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. २२ जुलै रोजी युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेल्या चव्हाण यांना अवघ्या महिन्याभरातच पुनर्नियुक्ती मिळाल्याने छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही, सुनील तटकरे यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा घाडगे यांनी दिला आहे. मला झालेल्या मारहाणीला एक महिनाही झाला नाही आणि मारहाण करणाऱ्याला पक्षात स्थान नसल्याचे स्वतः अजित पवारांनी म्हटले होते, मग ही पुनर्नियुक्ती कोणाच्या दबावाखाली झाली? हा सुनील तटकरे यांचा डाव आहे का? असा सवालही घाडगे यांनी उपस्थित केला. येत्या काळात महाराष्ट्रात सुनील तटकरे फिरताना छावा संघटना नक्कीच विरोध करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्परतेला यश
पावसाळी अधिवेशनात तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमात छावाचे कार्यकर्ते पोहोचले आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत पत्ते फेकले. यावेळी संतापलेल्या सूरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह विजयकुमार घाडगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांची युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली होती.
Sudhir Mungantiwar : ‘आ. सुधीर मुनगंटीवार हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी’
सूरज चव्हाण हे मुळचे लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळचे रहिवासी असून अजित पवारांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते आहेत. एकत्रित राष्ट्रवादीत त्यांनी महाराष्ट्र युवकचे कार्याध्यक्षपद भूषवले असून राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्या दहा जणांपैकी ते अजित पवारांसोबत गेले. २०१९ च्या पहाटेच्या शपथग्रहणावेळी आमदारांना परत आणण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
____