Chairman of the Agricultural Produce Market Committee in NCP : खामगाव कृउबासमध्ये सत्तांतराचे संकेत; चार संचालकही अजित पवार गटात
Khamgao खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे (कृउबास) सभापती सुभाष पेसोडे यांनी काँग्रेसला Congress रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) Ajit Pawar NCP मध्ये प्रवेश केला आहे. अमरावती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मकरंद पाटील आणि आमदार मनोज कायंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृत प्रवेश केला.
सभापती पेसोडे यांच्यासह कृउबासचे बांधकाम सभापती गणेश ताठे, संचालक विलास इंगळे, श्रीकृष्ण टिकार आणि सचिन वानखेडे यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या राजकीय घडामोडीमुळे खामगावातील काँग्रेस गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा Dilip Sananda यांची राजकीय अडचण वाढली आहे. सध्या सानंदा हे मुंबईत तळ ठोकून असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रवेशामुळे कृउबासमधील सत्ताबदलाच्या चर्चा सुरू झाल्या असून, बाजार समितीच्या राजकारणात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सभापती आणि संचालकांच्या पक्षप्रवेशावेळी खामगावातील एक काँग्रेस नेतेही उपस्थित होते. त्यांनीच उपमुख्यमंत्र्यांना सभापतींसोबत चार संचालक असल्याची माहिती दिल्याचे समजते.
Health minister of Maharashtra : आरोग्य यंत्रणेचा बट्ट्याबोळ; २५ गावांमध्ये रुग्णांचे हाल!
या नेत्याच्या निर्देशानुसारच पेसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतल्याची चर्चा आहे. काही दिवसांत स्वतःही पक्षप्रवेश करण्याची त्यांची तयारी असल्याचे बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर खामगावच्या काँग्रेस गोटात अस्वस्थता वाढली असून, स्थानिक राजकारणात भूकंप घडवणाऱ्या घडामोडींचा काळ सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.








