CID to unravel the mystery behind the aircraft acciden : बारामती विमानतळ दुर्घटनेचा सखोल तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे; तांत्रिक कारणांसोबतच घातपाताचा अँगलही तपासणार?
Mumbai महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी आणि या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या ‘आकस्मिक मृत्यू अहवाला’चा (ADR) आधार घेत सीआयडी आता या तपासाची चक्रे वेगाने फिरवणार आहे.
राज्य सरकारने गुरुवारी रात्री उशिरा यासंदर्भातील आदेश जारी केले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीपासून काही मीटर अंतरावर झालेल्या या अपघाताचा तपास करताना सीआयडी खालील बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे. सीआयडीने आधीच घटनास्थळाचा ताबा घेतला असून, त्याठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नाही. फॉरेन्सिक टीमने विमानाच्या अवशेषांचे आणि जळालेल्या भागांचे नमुने गोळा केले आहेत.
वैमानिकांची भूमिका, एटीसी (ATC) सोबत झालेला शेवटचा संवाद आणि लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नावेळी नक्की काय घडले, याचा सखोल अभ्यास केला जाईल. एका महत्त्वाच्या सार्वजनिक पदावरील व्यक्तीचा असा अकाली मृत्यू झाल्याने, कोणतीही कसर बाकी राहू नये यासाठी स्थानिक पोलिसांऐवजी सीआयडीकडे हा तपास दिला गेला आहे.
Akola Mayoral Election : ४५ विरुद्ध ३२ : भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचा दणदणीत विजय
विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या तांत्रिक संस्थांनीही आपला तपास सुरू केला आहे. अपघातग्रस्त ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) विमानाचा ब्लॅक बॉक्स (फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर) जप्त करण्यात आला आहे. त्यातील डेटावरून विमानात तांत्रिक बिघाड झाला होता की हवामानामुळे अडथळा आला, हे स्पष्ट होईल. सीआयडी पोलिसांच्या दृष्टिकोनातून तपास करेल, तर तांत्रिक बाजूंचा अहवाल एएआयबी तयार करणार आहे. या दोन्ही तपास यंत्रणांच्या निष्कर्षांवरून अंतिम अहवाल तयार केला जाईल.








