Ajit Pawar death news : अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Prime Minister Narendra Modi will reportedly attend the last rites of Deputy Chief Minister : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह बारामतीत येणार

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित अनंतराव पवार यांच्या निधनानंतर राज्य शासनाकडून राजशिष्टाचारानुसार शासकीय निर्णय घेण्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार 29 जानेवारीला बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याचे कळते.

सामान्य प्रशासन विभागाच्या (राजशिष्टाचार) माध्यमातून जाहीर करण्यात येणाऱ्या निर्णयानुसार २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यातील ज्या सर्व शासकीय आणि निमशासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविला जातो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत.

Ajit Pawar death news : २४ तासांत मदतीचा जीआर काढणारा लोकनेता हरवला!

राज्य शासनाच्या परंपरेनुसार, राज्यघटनेतील उच्च पद भूषविणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतात. यामध्ये मानाचा गार्ड ऑफ ऑनर, शासकीय ध्वजाने आच्छादित पार्थिव, तसेच अधिकृत शोक संदेश व उपस्थिती यांचा समावेश असतो.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थसंकल्पीय नियोजन, ग्रामीण विकास, सहकार चळवळ आणि प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच विविध महत्त्वाची खाती सांभाळताना त्यांनी अनेक निर्णायक धोरणात्मक निर्णय घेतले होते.

Will Maratha Reservation Deadlock End? : मराठा आरक्षणाचा पेच सुटणार? जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ‘सातारा गॅझेट’ लागू होण्याची शक्यता

 

शासकीय दुखवट्याच्या कालावधीत राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांबाबत स्वतंत्र निर्देश तसेच अंत्यसंस्काराच्या वेळापत्रकाबाबतची सविस्तर माहिती शासनाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यभरातून विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटना, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात असून, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
___