Ajit Pawar death : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात, सत्य लवकरच बाहेर येईल

Vijay-Wadettivar-tells-reason-behind-rohit-pawar-rahul-gandhi-meet : राहुल गांधी व रोहित पवार यांच्या भेटीवर काय म्हणाले वडेट्टीवार

Nagpur अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर रोहित पवार यांनी घातपाताची शंका व्यक्त केली होती. अनेक तांत्रिक मुद्यांकडे ते लक्ष वेधत आहे तसेच संबंधित कंपनीचा भोंगळ कारभारही त्यांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून यासाठी सरकार दबाव वाढवण्यासाठी ते विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीतही त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सोबतच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवर काँग्रेसचे नेत विजय वडेट्टीवार यांनी या अपघातामागची सत्यता बाहेर काढण्यासाठी राहुल गांधी त्यांच्यासोबत राहतील असे सांगितले.

हा अपघात नसून घातपात आहे. आता या बाबी समोर आल्या आहेत. देशातील लोकांनाही कळून चुकले आहे. असे असताना केंद्रीय उड्डायणमंत्री संबंधित कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

Sudhir mungantiwar : धारदार आयुधांचा ‘अनुभवी’ वापर आणि आ.सुधीर मुनगंटीवार यांची धडाकेबाज मांडणी

अमेरिका इजराईलने मिळून इराणवर हल्ला सुरू केला आहे. याची झळ आता भारतापर्यंत पोहोचली आहे. सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे हे होत आहे. इजराईलने युद्ध छेडण्याच्या दोन दिवसांपूर्वी आपल्या देशाच्या पंतप्रधान तेथे जाऊन येतात. आमच्या देशाच्या पंतप्रधानांना ट्रॅप केले.

Farmers Loan waiver : बँक कुठलीही असो, कर्जमाफी शेतकऱ्यांनाच मिळणार; मुख्यमंत्र्यांनी फेटाळले सर्व दावे

अमेरिकेच्या परवानगी नंतर रशियापासून भारत फक्त ३० दिवस तेल घेण्यास तयार आहे. याचा अर्थ भारताला आता ट्रम्प चालवत आहे. त्याचा इशाऱ्यावर भारत चालत आहे. करार करताना अमेरिकेसमोर भारत झुकला असल्याचे दिसून येते. कमर्शिअल गॅस कनेक्शन धारकांना सिलिंडर भरून मिळणार नसले तर हॉटेल इंडस्ट्री कोसळू शकते. याशिवाय महागाईसुद्धा वाढणार आहे. भारताचे धोरण चुकत आहे. ते दुरुस्त करावे असे वाटत नसेल तर भारताची अधोगतीकडे वाटचाल अटळ असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांसोबत बोलताना केली.