Deputy Chief Minister and Guardian Minister of Pune and Beed Ajit Pawar praised : उपमुख्यमंत्री व पुणे, बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले कौतुक
Maharashtra : नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा भारताने जिंकली. या स्पर्धेत विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडुंचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच संघ प्रशिक्षकांचे आणि भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करणारे प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व करणाऱ्या प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंचेही त्यांनी कौतुक केले.
विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड आणि सध्या पूणे तर, प्रतिक हा मुळचा पुणे जिल्ह्यातील आहे. योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अजितदादांकडेच आहे. या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे. नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला.
Ajit Pawar : आपल्या अजेंड्यापासून तसूभरही मागे पडायचे नाही !
विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या.
NDRF centre in Nagpur : संकटांशी दोन हात करण्याचे प्रशिक्षण नागपुरातून!
या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी अजित पवार यांनी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या आहेत.