Ajit Pawar Dies in Aircraft accident : अजितदादांची हिवरखेडमधील ‘ती’ भेट ठरली शेवटची

Akola’s political fraternity in mourning : अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

Akola राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाचे वृत्त समजताच अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. हिवरखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार काही दिवसांपूर्वीच अकोला जिल्ह्यात आले होते. स्थानिक विकासकामांबाबत त्यांनी केलेली चर्चा आणि कार्यकर्त्यांना दिलेले मार्गदर्शन आता अकोला जिल्ह्यासाठी त्यांची ‘शेवटची भेट’ ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात असून, सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, आक्रमक कार्यशैली आणि निर्णयक्षम नेतृत्वासाठी ओळखले जात होते. हिवरखेड येथील सभेत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह भरला होता, तो आठवून आज अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून शोकसभांचे आयोजन करण्यात येत आहे.

Ajit Pawar : खासदार ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंतचा सिक्सर ठरलेला अजित पवारांचा राजकीय प्रवास

अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जाणारे अकोल्याचे आमदार अमोल मिटकरी यांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. आपल्या नेत्याच्या निधनाची बातमी मिळताच मिटकरी यांना भावना अनावर झाल्या. अत्यंत भावूक अवस्थेत असलेल्या मिटकरी यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया न देता तातडीने बारामतीकडे प्रयाण केले. अजित पवार यांच्या जाण्याने आपण आपले मार्गदर्शक गमावल्याची भावना अकोल्यातील कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.