Mohol Senior Vice President; Pawars victory fight for prestige : मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष; प्रतिष्ठेच्या लढतीत पवारांची मुत्सद्दी
Mumbai : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या चौवार्षिक निवडणुकीत अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाला संपूर्ण संघटनेची एकमताने मान्यता मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी निवडणुकीच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया निरर्थक ठरवली. या निर्णयानंतर अजित पवार हेच अध्यक्ष म्हणून निश्चित झाले असून, त्यांनी ताबडतोब सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.
या निवडणुकीकडे राज्यभरात लक्ष लागले होते कारण सत्ताधारी पक्षातील दोन महत्त्वाचे नेते अजित पवार आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे ही निवडणूक केवळ क्रीडा संघटनेपुरती मर्यादित न राहता राजकीय प्रतिष्ठेची बनली होती.
School ID scam : शिक्षण नव्हे शोषण : शिक्षणाचे मंदिर नव्हे, तर बनावटगिरीचा बाजार !
धर्मादाय आयुक्तांनी यापूर्वीच्या दोन बदलांना नकार दिल्याने निवडणुकीवरील अनिश्चितता वाढली होती. अशा परिस्थितीत चर्चांच्या आणि बैठकांच्या फेऱ्यांनंतर दोन्ही गटांमध्ये समन्वय साधला गेला. या मुत्सद्दी चर्चांमुळे अखेर निवडणुकीचा संघर्ष टळला आणि अजित पवार यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड निश्चित झाली.
मुंबईत दुपारी दोन वाजता सुरू होणारी सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात साडेचारपर्यंत चर्चेतच रेंगाळली. संध्याकाळी अखेर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी दिले. त्यानंतर सभेत अजित पवार यांना संपूर्ण कार्यकारिणी निश्चित करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले.
अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर अजित पवार यांनी सभेत मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी २९ सदस्यांच्या कार्यकारिणीची रचना करण्यासाठी विविध संघटनांमधून प्रतिनिधींची निवड केली. एकूण ३५ सदस्यांची यादी तयार करून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर अंतिम करण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
womens world cup : इतिहास रचला, भारतीय महिलांचा विश्वविजयी जल्लोष!
२३ नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या पुढील सर्वसाधारण सभेत अजित पवार अधिकृतपणे नवी कार्यकारिणी जाहीर करतील. या निवडणुकीचा शेवट राजकीय संघर्षाऐवजी सामंजस्याच्या सूत्राने झाला असला तरी या प्रक्रियेत अजित पवार यांच्या मुत्सद्दीपणाने निर्णायक भूमिका बजावल्याचं मानलं जात आहे.








