Ajit Pawar : नागपुरात आमच्या कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी !

NCP Chief Ajit Pawar Says Rahul Gandhi’s Allegations Baseless : राहुल गांधींच्या आरोपांत काहीही तथ्थ्य नाही

Nagpur : भारतीय जनता पक्ष आज देश पातळीवरचा मोठा पक्ष आहे. त्या पक्षाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे प्रतिनिधीत्व करतात. नितीन गडकरी नागपूरचे खासदार आहेत आणि केंद्रीय मंत्री म्हणून प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सेनेच्याही वेगळ्या अपेक्षा आहेत. नागपुरात आम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही जागा मिळाल्या पाहिजे. आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार म्हणाले.

नागपुरात राष्ट्रीय चिंतन शिबिरासाठी आले असता अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, विदर्भ प्रत्येक वेळी कुण्याक एकाचा बालेकिल्ला राहिल, असं निश्चित नाही. मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळी काँग्रेस आय पक्षाने अनेकांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी ज्या लोकांना मिळाली, त्या लोकांना वाटलंही नव्हतं की आपण निवडून येऊ. पण त्यांना थेट जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला की, निवडून आल्याचे प्रमाणपत्र घेऊन जा. विदर्भात वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळे निकाल लागलेले आहेत. त्यामुळे आत्ताच निश्चित काही सांगता येणार नाही.

Vidarbh politics : विदर्भ प्रत्येक वेळी कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही !

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात विचारले असता, राहुल गांधींच्या आरोपात काहीही तथ्य नाही. जेव्हा ते निवडणुका जिंकतात तेव्हा काही घोळ ईव्हीएममध्ये किंवा मतदार यादीमध्ये त्यांना दिसत नाही आणि जेव्हा ते निवडणूक हरतात, तेव्हा त्यांचा कांगावा सुरू होतो. लोकसभेमध्ये आम्हाला इतक्या कमी जागा मिळाल्या. महाविकास आघाडी म्हणून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं. पण आम्ही काही तेव्हा अशा पद्धतीने काही मतचोरी किंवा ईव्हीएम हॅकचा आरोप केला नाही, असे पवार म्हणाले.

NCP Strategy Workshop : ‘ती’ जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची !

आम्ही आमच्या कामाला लागलो. आम आदमी पार्टी, ममता बॅनर्जी , काँग्रेसला देशात अनेक ठिकाणी दोनदा ,तीनदा सत्ता मिळाली आहे आणि त्या ठिकाणी ईव्हीएम आणि मतदान मतदार याद्या याबरोबर आहेत का, याचाही विचार आरोप करणाऱ्यांनी करावा. जेव्हा ते हरतात तेव्हाच त्यांना हे का आठवतं आणि ते जिंकतात तेव्हा त्यांना हे का आठवत नाही? कर्नाटकसुद्धा ते जिंकले, तेलंगाणा जिंकले, हिमाचलमध्ये जिंकले तेव्हा ईव्हीएममध्ये काही अडचण नव्हती का? ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या, आम आदमी पार्टी तीनदा दिल्लीत जिंकली, नंतर पराभव झाला, पंजाबमध्ये ते जिंकले . मग हरल्यावर त्यांना हे सगळं कसं आठवतं, असा प्रश्न अजित पवार यांनी केला.