Ajit pawar NCP : नागपूर राष्ट्रवादीत ‘दादां’नंतर वर्चस्वाची लढाई; आजी-माजी जिल्हाध्यक्षांमध्ये संघर्ष पेटला!

Fight-for-existence-in-nagpur-ncp-after-ajit-pawar-death : अंतर्गत कलह चव्हाट्यावर, विद्यमान जिल्हाध्यक्षावर निष्क्रियतेचा ठपका

Nagpur उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर जिल्हा संघटनेतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे यांच्या कार्यपद्धतीवर ‘निष्क्रियतेचा’ ठपका ठेवत ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी माजी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या नेतृत्वाखाली समांतर बैठक घेतली. या बैठकीमुळे जिल्ह्यात आजी-माजी जिल्हाध्यक्षांमधील वाद उफाळून आला असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
सहा महिन्यांपूर्वी पक्षांतर्गत फेरबदल करताना तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्याकडून जबाबदारी काढून घेत ती राजाभाऊ ताकसांडे यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

Katol blast : आणखी तीन महिलांनी घेतला अखेरचा श्वास, स्फोटाच्या वेदनांमध्ये होरपळताहेत कुटुंब

मात्र, त्यांच्या नियुक्तीनंतर झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. या अपयशानंतर ताकसांडे यांनी संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे, सहा महिने उलटूनही अद्याप जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर न झाल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

विद्यमान अध्यक्षांकडून संघटन पातळीवर कोणताही कार्यक्रम राबवला जात नसल्याने, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बाबा गुजर यांनी सोमवारी रविभवन येथे विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्ह्यातील फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुख उपस्थित होते.

Rajya sabha election : सातही उमेदवारांची निवड निश्चित, राज्यसभा निवडणूक बिनविरोध!

राजाभाऊ ताकसांडे यांना जुन्या कार्यकारिणीतील सदस्यांना स्थान द्यायचे नाही आणि त्यांना नवीन कार्यकर्ते मिळत नाहीत, यामुळेच कार्यकारिणी रखडल्याचा गंभीर आरोप या बैठकीत करण्यात आला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे सात सदस्य निवडून आले होते. ही ताकद टिकवून ठेवण्यासाठी महायुतीमार्फत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे ध्येय या बैठकीत निश्चित करण्यात आले.

Gram Panchayat Elections : ‘गुगल अर्थ’वर गावे अजूनही पाण्याखाली; प्रभागरचनेत तांत्रिक अडथळा

पक्षाने पद दिले किंवा नाही दिले, तरी चालेल; पण अजितदादांचा पक्ष जिल्ह्यात ताकदीने उभा करू, अशी शपथ यावेळी कार्यकर्त्यांनी घेतली. राज्यातील सत्तेत सहभागी असूनही जिल्ह्यात पक्षाची आक्रमकता दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले होते. ही मरगळ झटकण्यासाठी बाबा गुजर यांनी पुढाकार घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. या समांतर बैठकीमुळे नागपूर राष्ट्रवादीत नेतृत्वावरून उभा संघर्ष निर्माण झाला असून, पक्षश्रेष्ठी या वादावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.