Breaking

Ajit Pawar NCP : गडचिरोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का!

Former MLA of Uddhav Thackeray group joins NCP : माजी आमदाराने धरली अजितदादांच्या राष्ट्रवादीची वाट

Gadchiroli लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अनेकांनी महाविकास आघाडीकडे जाण्याचा विचार केला. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेशही झाले. पण विधानसभा निवडणुकीने सारे चित्रच बदलून टाकले. आता अनेक माजी आमदार-खासदार महायुतीमधील पक्षांमध्ये जाणं पसंत करत आहेत. गडचिरोलीमध्येही असेच काही घडले आहे. येथील माजी आमदाराने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधलं आहे.

आरमोरी क्षेत्रातून सलग दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी Ramkrushna Madavi यांनी उध्दवसेनेला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला.

Harshawardhan Sapkal : मढीच्या दुकानदारांना सपकाळ यांनी दिला धीर !

डॉ. मडावी १९९५ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेत पोहोचले. १९९९ मध्येही त्यांनी विधानसभा गाठली. २००४ मध्ये ते हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर होते. पण त्यांचा पराभव झाला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. ते मुख्यमंत्री देखील झाले. पण त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. शिवसेना दुभंगल्यानंतरही ते उध्दव ठाकरेंसोबतच राहिले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून MNS त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पण त्यांनी निवडणूक न लढविता उध्दवसेनेतच राहणे पसंद केले होते. अलीकडेच पक्षाने त्यांना जिल्हा समन्वयकपदाची जबाबदारी दिली होती. पक्षनेत्यांनी दुय्यम पद दिले, एवढी वर्षे निष्ठा बाळगल्याची कदर केली नाही. याचे त्यांना दुःख झाले. यातून त्यांनी उध्दवसेनेसोबत नाते तोडून राष्ट्रवादीसोबत नवा प्रवास सुरु केला आहे.

Eknath Shinde : चांगल्या रस्त्यांचे राज्य, ही महाराष्ट्राची ओळख व्हावी !

उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात डॉ. मडावी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, शिवाजीराव गर्जे, राजू नवघरे, मनोज कायंदे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण , जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आदी उपस्थित होते.