Resignations of office bearers of Sharad Pawar group : अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची चर्चा
Buldhana बुलढाणा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जिल्हा प्रवक्ते सुजित देशमुख, शहराध्यक्ष अनिल बावस्कर आणि शहर कार्याध्यक्ष सत्तार कुरेशी यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. हे तिन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदे सोडल्याने गटाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
विश्वासार्ह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुजित देशमुख, सत्तार कुरेशी आणि अनिल बावस्कर यांनी आपापसात चर्चा करून पक्षातील असमाधानामुळे आणि आगामी राजकीय दिशा लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. लवकरच ते अजित पवार गटात अधिकृत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.
Blow to Congress : माजी उपाध्यक्षासह अल्पसंख्याक नेते भाजपात!
या राजीनाम्यांमुळे शरद पवार गटात अंतर्गत नाराजी आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील संघटनात्मक बांधणीसाठी महत्वाची भूमिका निभावणारे हे तीनही पदाधिकारी अचानकपणे बाहेर पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
Congress protest : हक्काच्या निधीवर गदा; काँग्रेसचा महायुतीविरोधात मोर्चा
बुलढाणा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हा एक प्रभावशाली पक्ष मानला जातो. मात्र, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बाहेर पडण्यामुळे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.