Breaking

Ajit Pawar : अजित दादांचाचा रोहित पवारांवर ‘उपटसूंभ’ म्हणत टोला

Response to criticism on the issue of internal factionalism : अंतर्गत गटबाजीच्या मुद्द्यावरील टीकेला प्रत्युत्तर

Ahilyanagar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना
‘ उपटसूंभ’ असा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अहिल्यानगर येथे माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अंतर्गत गटबाजी असल्याच्या मुद्द्यावर टीका करत आहेत. त्यावर बोलताना त्यांनी टीका केली आहे.

तसेच रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाकडून मिळालेली चिन्हं पुन्हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाला मिळतील, असेही म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, आमच्या पक्षात किती गट आहेत हे आम्ही ठरवू. इतरांनी फुकटचा सल्ला देण्याचं काही कारण नाही. कोण काय बोलतं याच्याशी मला काही देणंघेणं नाही. महाराष्ट्रात कोणीही ‘उपटसूंभ’ उठेल आणि काहीही प्रश्न विचारेल, त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही.

Devendra fadanavis : राज्यमंत्री बैठका घेऊ शकतात धोरणात्मक निर्णयासाठी मंत्र्यांची मान्यता आवश्यक

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर अजित पवारांनी सडेतोड भूमिका घेतली. माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केलं की, काय निर्णय घ्यायचा हे आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर ठरवू. त्यावेळेसच निर्णय जाहीर केला जाईल. मंत्रिमंडळात कोण असावं किंवा नसावं हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.

यावेळी धनंजय मुंडे यांच्या संभाव्य पुनर्नियुक्तीबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, कृषी खात्याशी संबंधित आरोपांमध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. राज्य सरकारकडून न्यायालयीन चौकशी करण्यात येत आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील.

लाकडी बहीण योजनेबाबत गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर अजित पवारांनी या विषयावरही मत व्यक्त केले. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे अशा गरीब महिलांसाठी ही योजना आहे. काही नोकरदार भगिनींनी तसेच पुरुषांनीही याचा गैरफायदा घेतल्याची माहिती आहे. अशा प्रकरणांमध्ये काय पावलं उचलायची हे आम्ही ठरवू. गरज असल्यास वसुली केली जाईल, असे ते म्हणाले.

Adivasi Pardhi Development Council : जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करत अजित पवार म्हणाले की, भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान मानले जाते. सर्व घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या या संविधानामुळेच आज आपण प्रगल्भ लोकशाहीत जगत आहोत.