Breaking

Ajit Pawar : स्वारगेट बस स्थानकातील घटना शरमेने मान खाली घालायला लावणारी!

The incident at Swargate bus station is shameful : पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्तिशः लक्ष घालून आरोपीला तात्काळ अटक करावी

Pune : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Pratap Sarnaik : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा!

पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल. यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या असल्याचेही अजित पवार म्हणाले.

Prashant Koratkar : कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी गाठले नागपूर!

पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली असता, दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीने तिला फसवून बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने समाजमन संतापले आहे.