Ajit Pawars provocative questions to Jayant Patil : अजित पवार यांचं जयंत पाटलांवरून खोचक सवाल
Islampur : आवाजात प्रेमळ प्राण असलेलं देखणं नेतृत्व म्हणजे जयंत पाटील. पण आम्ही काय देखणे नाही का? वाळव्याला बोलवायचं आणि आमचीच बिनपाण्यानं करायची,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर खोचक टिप्पणी केली.
इस्लामपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार हे एकत्र आले होते. यावेळी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
अजित पवार म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेत कुठेही आम्ही तडजोड केलेली नाही. मला रोहितने सांगितलं होतं, जयंत पाटील आणि मी हेलिकॉप्टरने जाणार. मला वाटलं भाषण ऐकायला हे दोघेही नसतील. पण नशीब बघा, दोघेही माझं भाषण ऐकायला आले. जयंत पाटील यांच्या आवाजात प्रेमळपणा आहे, त्यांचं देखणं व्यक्तिमत्व आहे, असा उल्लेख केला गेला. पण मग आम्ही काय देखणे नाही का? असं म्हणताच उपस्थित नेत्यांसह श्रोत्यांमध्ये हशा हशा पिकल्या.
Chandrashekhar Bawankule : पारधी समाजाच्या विकासाचा नागपूर पॅटर्न राज्यभर राबवणार !
दरम्यान, भाषणादरम्यान काही मुले गोंधळ घालत असल्याचे पाहून अजित पवारांनी त्यांना थेट सल्ला दिला. ते म्हणाले, आज ज्ञान हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. एआयसाठी राज्य सरकारने बजेटमध्ये ५०० कोटींची तरतूद केली आहे. पण मुलांनो, तुम्ही इथे फक्त ओरडत आहात आणि मुली मात्र अभ्यास करून पुढे जात आहेत. पुढे याच मुली तुम्हाला नाकारतील. त्यामुळे ओरडणं बंद करा आणि अभ्यासात लक्ष द्या. अजित पवारांच्या या विनोदी, थोड्या टोलेबाज पण मार्गदर्शक भाषणामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साह आणि हशा पिकला.
_____