Breaking

Ajit Pawar : “कुणी आडवे आले तर खपवून घेणार नाही”

Deputy Chief Minister’s proposal to create three new municipalities in Pune : अजितदादांचा इशारा कुणाकडे? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितले

Amravati पुण्यात तीन नवीन महापालिका करण्याचा अजित पवार यांचा प्रस्ताव आणि “कुणी आडवे आले, तर खपवून घेणार नाही” हा त्यांचा इशारा हा आमच्याकडे नव्हे, तर मुख्यमंत्र्यांकडे होता, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सरचिटणीस आ. रोहित पवार Rohit Pawar यांनी सांगितले. ते शुक्रवारी अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार पुण्यात तीन नवीन महापालिका करण्याच्या तयारीत आहेत. “दादांना खूप काही करायचे आहे” असे दिसते, असे आ. रोहित पवार म्हणाले. दादा हिंजेवाडीला भेट देत असताना मुख्यमंत्र्यांनी आयटी सेंटरमध्ये बैठक घेतली. “कुणी आडवे आले, तर खपवून घेणार नाही” हा दादांचा इशारा आमच्याकडे नसून मुख्यमंत्र्यांकडे होता. या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Digital Registration : सीईओंना भेटण्यासाठी क्यूआर कोड अनिवार्य!

एमआयडीसी परिसरात दादांच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना काम मिळत नाही, असा आरोप आ. पवार यांनी केला. “राज्य सरकारमधील भ्रष्टाचार आम्ही आक्रमकपणे मांडत असल्याने, काही लोकांच्या माध्यमातून आमच्यावर आरोप लावले जात आहेत,” असे ते म्हणाले.

सोलापूरमधील मारहाणीच्या घटनेविषयी बोलताना पवार म्हणाले, “ही घटना राजकीय वादातून नव्हे, तर पूर्ववैमनस्यातून घडलेली आहे. शरणू हांडे यांनी जी नावे घेतली ती कोल्हापुरातील आहेत. हांडे हे आ. गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असून, अमित सुरवसे हा आमचा कार्यकर्ता आहे. सुरवसेवर हल्ला झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. मग पोलिस हल्लेखोरांवर तेवढेच गंभीर गुन्हे दाखल करणार का?”

“माउली हळणवत या पडळकर यांच्या कानात काही सांगतात आणि त्यानंतर पडळकर यांनी माझे नाव घेतले. याचे पुरावे आहेत. आम्ही त्याला भीत नाही. हळणवत यांचे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, अजित पवार यांच्यासोबत फोटो आहेत. त्या व्यक्तीवर वाळूच्या गैरव्यवहाराचे गुन्हे असून, त्याला पडळकर अधिवेशनात आणतात. या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे,” असे पवार म्हणाले.

Mahayuti Government : अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा, प्रशासन लागले कामाला

“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेची जमीन हडप केल्याचे प्रकरणही समोर आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन वर्षे झाली तरी गुन्हा दाखल झालेला नाही. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु आम्ही आ. पडळकर यांच्या धमकीला किंवा ईडीला घाबरत नाही,” असे आ. पवार यांनी ठामपणे सांगितले.