A strong step towards development through the budget : कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी न्याय देणारा अर्थसंकल्प
Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज (१० मार्च) सादर केलेला हा अर्थसंकल्प शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करणारा आहे. त्यामुळे रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, अशी प्रतिक्रिया कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिली.
विशेषतः कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी हा अर्थसंकल्प न्याय देणारा आहे. त्यांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा हा अर्थसंकल्प ठरेल, असे सांगत महाराष्ट्र आता एका नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे आणि हा अर्थसंकल्प त्या दिशेने बळकट पाऊल असल्याचे मंत्री ॲड. फुंडकर यांनी म्हटले आहे.
शिक्षणासाठी भरीव तरतूद – चंद्रकांत पाटील
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी विद्यार्थी हित आणि शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल, प्रगतीचा, विकासाचा ध्यास आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील म्हणाले.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागास 3 हजार 98 कोटी रुपये तरतुदी केली आहे. यामध्ये विद्यार्थी हिताला अधिक प्राधान्य देऊन शैक्षणिक गुणवत्ता उंचविण्यासाठी येणार आहे. तसेच महिला, बालके, युवक, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठ अन्न सुरक्षा, निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण सुविधा आणि रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडविण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत, असेही मंत्री चंद्रकांत पाटील अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.