Breaking

Akash Fundkar : डीपीसी बैठकीत भाजप-शिवसेना आमदारांमध्ये वादावादी

Argument between BJP-Shiv Sena MLAs in DPC meeting : पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत दलित वस्ती निधीवरून शाब्दिक चकमक

Akola जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र, या बैठकीत भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार नितीन देशमुख यांच्यात दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीच्या वाटपावरून तीव्र वाद झाला.

नितीन देशमुख यांनी जिल्ह्यातील दलित वस्तीवरील विकासकामांकरिता प्राप्त निधीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी प्रशासनाकडे निधीच्या असंतुलित वाटपावर नाराजी व्यक्त केली. यावर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांचा आक्षेप फेटाळत निधी वाटप हे नियमानुसारच होत असल्याचे स्पष्ट केले.

Superintendent of Police Archit Chandak : “भाईगिरी बंद करा, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा!”

त्यानंतर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आणि वातावरण चिघळले. एकमेकांवर व्यक्तिगत टिका करताना, दोघेही आक्रमक झाले. काही काळासाठी बैठक तणावपूर्ण झाली. पालकमंत्री फुंडकर यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी सर्व उपस्थितांना विषयाच्या गांभीर्याची जाणीव करून देत चर्चा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या यंदाच्या बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीच्या विकास आराखड्यावर चर्चा झाली. यंदा जिल्ह्यासाठी ३३३ कोटी रुपयांची वार्षिक योजना मंजूर करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात तो निधी अद्याप जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही, ही बाबही या बैठकीत उघड झाली. त्यामुळे विकासकामांवर गती न लागल्याचे मान्य करण्यात आले.

Local Body Elections : प्रभाग रचनेचा निर्णय होईना, इच्छुकांचा जीव टांगणीला!

या वादामुळे स्थानिक राजकारणात निर्माण होणाऱ्या संभाव्य परिणामांचीही चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटू शकतात, असे निरीक्षण राजकीय वर्तुळातून नोंदवले जात आहे.

Maha Politics : आदित्यने आपले ठाकरे हे आडनाव बदलवून घ्यावे !

जिल्हा नियोजन समिती ही प्रगल्भ लोकशाहीच्या विकास प्रणालीतील एक घटक असून, येथे लोकप्रतिनिधींनी विकास कामांसंदर्भात चर्चा करणे अपेक्षित असताना दोन जबाबदार लोक प्रतिनिधी असंसदीय भाषेचा वापर करीत वैयक्तिक टीकाटिप्पणी करत असल्या बद्दल राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त होत आहे.