Canals are not cleaned regularly : मंत्री फुंडकर यांनी टोचले प्रशासनाचे कान, जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप
Akola हजारो वर्षांच्या पावसाने जमिनीत निर्माण झालेल्या पाण्याच्या साठ्याचा उपसा हानीकारक ठरेल. त्यामुळे पाण्याच्या उचित वापराची सवय व्हावी. दुर्दैवाने कालव्यांची नियमित स्वच्छता होत नाही, त्यामुळे शेवटच्या बिंदुपर्यंत पाणी पोहोचत नाही, या शब्दांत पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी प्रशासनाचे कान टोचले. त्याचवेळी स्वच्छतेत सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला.
जलसंपदा विभागातर्फे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप कार्यक्रम नियोजन भवनात झाला, त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार, अकोला सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता योगेश दाभाडे, कार्यकारी अभियंता अमोल वसुलकर आदी उपस्थित होते.
Vidarbha Farmers : २५५ कोटींचे कर्जवाटप, तरी शेतकरी सावकाराच्या दारी!
जल व्यवस्थापनाची कृती केवळ पंधरवड्यापुरती मर्यादित न राहता जल व्यवस्थापनाचा जीवनशैलीत अंगीकार व्हावा, असेही ते म्हणाले. ‘इस्त्रायल तसेच काही आखाती देशांमध्ये कमी पावसातही उत्कृष्ट नियोजनातून समृध्दी निर्माण करण्यात आली. त्या तुलनेत आपल्याकडे पाण्याची मोठी उपलब्धता आहे. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे.’
पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत पाणी वापर संस्थांमध्ये जागरूकता निर्माण करावी. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व्हावे जेणेकरून उन्हाळ्यात टंचाई निर्माण होणार नाही. जल व्यवस्थापनासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
BJP leader criticizes Congress : काँग्रेसचीच मानसिकता ‘पाकिस्तानी’!
’प्रत्येक थेंब अधिक उत्पादन’ या सूत्रानुसार शेती सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. त्याबाबत या जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी व जलसंपदा विभागाने समन्वयाने कार्य करावे, असे जिल्हाधिकारी कुंभार यांनी सांगितले.