Akash Fundkar : नगराध्यक्षपदासाठी फुंडकरांच्या घरातूनच उमेदवारी!

Candidature for the post of Municipal Council President comes from the Fundkar family itself : भाजप गोटात अपर्णा सागर फुंडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब”

Khamgao आगामी नगरपालिका निवडणुकीची राजकीय तापमान वाढले असताना भाजपात नगराध्यक्षपदासाठी उमेदवार कोण? यावरून चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला होता. मात्र भाजपाच्या प्रमुख गोटातून अखेर एकमताने “घरातीलच उमेदवार” देण्याचा सूर बुलंद होत गेला आणि त्याला आकारही आला आहे. ना. आकाश फुंडकर यांनी आपल्या कुटुंबातीलच सौ. अर्पणा सागर फुंडकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शहरातील प्रभागांची नव्याने झालेली पुनर्रचना, १७ प्रभागांतून निवडून येणारे ३५ नगरसेवक आणि थेट जनतेतून होणारी नगराध्यक्षाची निवड — या सर्वाचा विचार करता हे पद अधिकच प्रतिष्ठेचे बनले आहे. भाजपातून तब्बल डझनभर आजी-माजी नगरसेवकांनी मुलाखती दिल्या असल्या तरी अंतर्गत मतभेद टाळण्यासाठी ‘फुंडकर घराण्यातील’ नावच योग्य ठरेल, अशी ठाम भूमिका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी घेतली होती.

Local Body Elections : शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस

खामगावच्या राजकीय इतिहासात काही कुटुंबांनी अनेकदा नगराध्यक्षपद भूषविल्याची उदाहरणे देत कार्यकर्त्यांनीही फुंडकरांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. माजी आमदार सानंदा फुंडकर यांनी दोन वेळा नगराध्यक्षपद सांभाळले. तर त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि भावालाही हे पद लाभले होते. त्यातच पुढे भारतीताई राजपूत व यांनी नगराध्यक्षपद टिकवून ठेवत कुटुंबाचा प्रभाव कायम ठेवला होता.

भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या सखोल चर्चेनंतर अॅड. फुंडकर यांच्या वहिनी सौ. अर्पणा सागरदादा फुंडकर यांच्या नावाबाबत सहमती दर्शविण्यात आली. हे नाव औपचारिकरित्या पक्षाकडे पाठविण्यात आले असून मंजुरीही मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे “नगराध्यक्षपद फुंडकरांनी घरातूनच दिले!” अशी चर्चा शहरभर रंगत असून आगामी निवडणुकीत भाजपात नवीन राजकीय समीकरणे आकार घेण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.