Breaking

Akash fundkar : मुलांनो, मेहनतीवर विश्वास ठेवा !

Guardian minister wishes best luck to students for board exams : पालकमंत्र्यांच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Akola : “शिक्षण हे केवळ गुणांसाठी नाही. ज्ञानवृद्धी आणि जीवनमूल्य घडविण्याचे साधन आहे. मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करा,” असा संदेश देत राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी. उज्ज्वल भविष्यासाठी शासन-प्रशासन सदैव विद्यार्थ्यांच्या सोबत असल्याचेही फुंडकर म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या १०० दिवस कृती आराखड्यानुसार कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

Labour ministry : कामगारांचे नव्हे, एजंटांचेच ‘कल्याण’!

परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. परीक्षा केंद्रे पूर्णतः कॉपीमुक्त व भयमुक्त राहतील याची दक्षता घेतली जात आहे.

यशस्वी भविष्यासाठी मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न हाच यशाचा मूलमंत्र असल्याचे सांगत पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.