Maharashtra is undergoing comprehensive development : पालकमंत्री फुंडकर यांचा दावा; कामगार दिनी साधला संवाद
Akola सुमारे साडेसहा दशकांच्या वाटचालीत महाराष्ट्राने प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत राज्याने प्रदीर्घ काळापासून स्वत:चे अग्रस्थान अढळ ठेवले आहे. राज्य शासनाने नवनव्या लोकहितकारी धोरण व निर्णयांनी विकासप्रक्रिया अधिक गतिमान व सर्वसमावेशक झाली आहे, असा दावा राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ झाला. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पालकमंत्री म्हणाले, प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातकलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक योजना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे.
Mahayuti Government : श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन आता सरकार साजरा करणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत 4 लक्ष 37 हजार 626 महिलांना लाभ मिळाला. अंत्योदय अन्न योजनेच्या 45 हजार 664 शिधापत्रिकाधारकांना साड्यांचे वितरण करण्यात आले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरीमुळे जिल्ह्याला बालस्नेही पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासित कार्यक्रमात जिल्ह्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.
Rural student games : आता विभागीय आणि राज्यस्तरावर खेळतील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी !
ते म्हणाले, ‘केंद्र शासनाचे नवे कामगार धोरण व कायदे लागू करताना महाराष्ट्रात कामगार हिताची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. राज्यातील कामगार कायद्यात सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात येत आहे. असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र निधी व सुधारणा योजना, माथाडी कामगार व खासगी सुरक्षा रक्षक कायद्यात सुधारणा वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी दरवर्षी निवृत्ती वेतन आदी निर्णय घेतले आहेत.