Permanent market for products of self-help groups : पालकमंत्री फुंडकर यांच्या हस्ते ‘वऱ्हाडी जत्रा-२०२५’चा शुभारंभ
Akola ‘वऱ्हाडी जत्रा सरस प्रदर्शन’ हे वऱ्हाडच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे. खेड्यापाड्यातील महिलांच्या बचत गटांना या माध्यमातून भक्कम व्यासपीठ मिळाले आहे. जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.
ग्रामविकास व पंचायतराज विभाग, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर आयोजित ‘वऱ्हाडी जत्रा-२०२५’ या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, आमदार रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाने, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक मनोज जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड आदी उपस्थित होते.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, ‘वाद नाहीत तर संमेलन कसले!’
जत्रेत जिल्ह्यातील अनेक महिला स्वयंसहाय्यता गटांनी सहभाग घेतला असून, त्यांनी आपल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन मांडले आहे. पालकमंत्र्यांनी जत्रेतील विविध कक्षांना भेट देऊन महिलांशी संवाद साधला. “बचत गटांनी शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी. त्यासाठी बचत गटांच्या उत्पादनांसाठी एक कायमस्वरूपी विक्री भवन असावे, यासाठी निश्चित प्रयत्न करू,” असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, ‘अभिजात साहित्याच्या प्रचाराला AI चा पर्याय’
‘वऱ्हाडी जत्रा-२०२५’ उपक्रमात बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दालने, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आहे. तसेच दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही जत्रा ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली राहणार आहे.