Breaking

Akash Fundkar : लहान कलाकारांवर अन्याय होऊ देणार नाही !

We will not allow injustice to be done to young artists : विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्याच्या कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या सूचना

Mumbai : चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक तसेच चित्रपट उद्योगांशी संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज (२८ जानेवारी) संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सिने टीव्ही असोशिएशनचे पदाधिकारी मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारासिंग, संजय पांडे, उपासना सिंग यांनी आज मंत्रालयात कामगार मंत्री फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव दिपक पोकळे उपस्थित होते.

Ashish Shelar : यावर्षीपासून साजरा होणार आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव !

कामगार मंत्री फुंडकर म्हणाले की, राज्यातील लहान कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कलाकारांवर कंत्राटदार किंवा निर्मात्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर लहान कलाकारांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी ड्राफ्ट तयार करण्यात येणार आहे. तो लवकरच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, असेही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.